Home > रिपोर्ट > साताऱ्याच्या अश्विनीची कोरोनाग्रस्त वुहानमधून सुटका

साताऱ्याच्या अश्विनीची कोरोनाग्रस्त वुहानमधून सुटका

साताऱ्याच्या अश्विनीची कोरोनाग्रस्त वुहानमधून सुटका
X

चीनमधील वुहान येथे अडकलेल्या अश्विनी पाटील यांच्यासह इतर ९० भारतीयांना परत आणण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या पत्राची भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दखल घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. तसेच साताऱ्याची अश्विनी पाटील या पुन्हा भारतात येणार याबद्दल आनंद व्यक्त केलाय.

चीनच्या वुहान प्रांतात कोरोना व्हायरसने थैमान घातलय आणि जगभर या रोगाची दहशत पसरली आहे. अशा स्थितीमध्ये महाराष्ट्राची अश्विनी पाटील या वुहान प्रांतात अडकलीय. ११ फेब्रुवारीला अश्विनीसोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीच्यासोबत व्हिडीओ कॉलींगद्वारे संवाद साधला होता. अश्विनी यांच्याशी संवाद साधताना सध्या वुहान येथील उपलब्ध सुविधांबद्दल माहिती घेतली तसेच तिला आश्वासक धीर दिला आणि चीन मधील भारतीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून लवकरात लवकर मुंबईमध्ये आणण्याबद्दल जितके शक्य आहे तितके प्रयत्न करेन असं आश्वासन दिलं होत.

यानंतर देशाचे परराष्ट्रमंत्री डॉ जयशंकर यांना एक पत्र लिहून अश्विनी यांच्या सद्य परिस्थितीबद्दल माहिती देऊन भारत सरकारने लवकरात लवकर पावले उचलून अश्विनी यांना आपल्या देशात आणण्याची विनंती केली होती.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आल्याचा त्यांनी आनंद व्यक्त केलाय सोबतच भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे आभारही मानले आहेत.

Updated : 20 Feb 2020 11:57 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top