बदली झाल्यानंतर मेट्रो वुमन अश्विनी भिडे यांची पहिली प्रतिक्रिया
Max Woman | 27 Jan 2020 4:56 PM IST
X
X
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले. यामध्ये मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुन अश्विनी भिडे यांची देखील बदली करण्यात आली. एकूण राज्यात चार दिवसांपूर्वी २० प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.या निर्णयावरून अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. दरम्यान पदावरून बदली झाल्यानंतर अश्विनी भिडे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र ही खदखद अखेर त्यांनी एका ट्विटद्वारे व्यक्त केली.अश्विनी भिडे यांची इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या लेखाचं ट्विट त्यांनी रिट्विट करून त्यांनी खंत व्यक्त केली आहे.
“आपण आपले काम व्यावसायिक आणि अतिशय आवडीने करता. मात्र वेगवेगळ्या लोकांकडून विविध मार्गानं अडथळा आणण्याचा केला जातो, जे आपल्या नियंत्रणाबाहेर आहे. जे प्रत्यक्षात संबंधित विषयावर काम करतात, त्यांनाच काय करावे लागेल आणि काय करण्याची गरज आहे. काय केले, हे समजू शकते. बाकी सर्व आपआपला बघण्याचा दृष्टिकोन आहे. महत्त्वाचे काय आहे की आपण नोकरी करतो.”
अशा शब्दात भिडे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
U do ur job professionally & with passion. Hw it’s interpreted differently by different people is out of ur control. Only those who actually work on it can hv the real understanding of what needs to be done & what was done. Rest all is perception. What matters is you do ur job. https://t.co/bIf2VjmzvI— Ashwini Bhide (@AshwiniBhide) January 26, 2020
Updated : 27 Jan 2020 4:56 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire