Home > रिपोर्ट > अश्विनी भिडे यांची 'मेट्रो'तून बदली

अश्विनी भिडे यांची 'मेट्रो'तून बदली

अश्विनी भिडे यांची मेट्रोतून बदली
X

मुंबई मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडांची कत्तलीनंतर अश्विनी भिडे हे नाव चर्चेत आलं. मुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडे यांची बदली झाली आहे. आता हा पदावर रणजीत सिंह देओल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपची सत्ता असताना भिडे यांच्याकडे मुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. आरे कॉलनीत कारशेड उभारण्याबाबत मुंबईतील नागरिकांनी विरोध केला यामध्ये शिवसेनेने देखील विरोध दर्शवला होता. अखेर अश्विनी भिडे यांची बदली झाली. त्यामुळे सर्व माध्यमात ही चर्चा आहे की त्यांची बदली मुंबई मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडांची कत्तली वादग्रस्त ठरल्यामुळे बदली करण्यात आली आहे. त्यांना अद्याप कोणतीही पोस्टिंग देण्यात आलेली नाही.

Updated : 22 Jan 2020 6:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top