त्या महिले समोर झुकली व्यवस्था
Max Woman | 13 Sept 2019 12:42 PM IST
X
X
नागपूर मध्ये राहणाऱ्या भारती बड़वाईक त्यांची मुलगी 6 महीन्यांची असल्यापासून माहेरी राहतात. मुलीच्या शालेय शिक्षाणानंतर पुढच्या शिक्षणासाठी त्यांना जातीच्या प्रमाणपत्राची आवश्यकता होती. परंतू त्यांच्या पतीने कागदपत्र देण्यास नकार दिल्यानं त्यांनी थेट कोर्टात धाव घेतली आणि अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आईच्या नावाने जातीचे प्रमाणपत्र मिळवले.
सुरुवातीला त्यांनी पडताळणी विभागाकडे आपल्या मुलीचे प्रमाणपत्र आईच्या जाती वर ठरवा. अशी विनंती केली. परंतु अशी तरतूद आपल्या कायद्यात नसल्याचं सांगत विभागाने प्रमाणपत्र देण्यास मनाई केली. आपल्या देशात नागालैंड, मणिपुर, अरुणाचल सारखी अनेक मातृप्रधान राज्य जिथे मातृ संस्था चालते. परंतू आपल्या राज्यातील पुरूषप्रधान कायदे त्यांच्या आड आले. पण त्यांनी हार न मानता मुलीच्या शिक्षणासाठी उच्च न्यायालयात याचीका दाखल केली.
त्यानंतर 3 वर्षांनतर त्यांची मुलगी आचलला जातप्रमाणपत्र देण्याचा आदेश उच्च न्यायालने दिला. त्या नुसार आचल भारती बड़वाईक या नावाने प्रमाणपत्र देण्यात आलं. भारती बडवाईक यांनी हे पाऊल उचलून सर्व एकल, घटस्पोटी आणि विधवा महिलांचे प्रश्न दूर केलं आहेत.
Updated : 13 Sept 2019 12:42 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire