Home > News > जया बच्चन यांच्या वक्तव्यानंतर आराध्या ट्रोल

जया बच्चन यांच्या वक्तव्यानंतर आराध्या ट्रोल

जया बच्चन यांच्या वक्तव्यानंतर आराध्या ट्रोल
X

राज्यसभेत बॉलिवूड इंडस्ट्रीचा मुद्दा मांडण्यात आला. यावेळी रवि शंकर यांनी इंडस्ट्रीतील कलाकारांकडून होणाऱ्या ड्रग्स सेवनाचा मुद्दा उपस्थित केला. कलाकारांच्या चौकशीची मागणी केली आहे. यावर जया बच्चन यांनी आक्षेप घेत ज्या ताटात खातात, त्याच ताटात नंतर छेद करतात अशा शब्दांत टीका केली. या वक्तव्यावर अनेकांनी जया बच्चन यांना पाठिंबा दर्शवला.

या वक्तव्यानंतर जया बच्चन यांना सोशल मिडियावर ट्रोल करण्यात आले. सोशल मीडियावर एका युजरने जया बच्चन यांची नात आराध्या हिच्यावर निशाना सादत एक ट्विट केलं आहे. प्रत्येकाची वेळ येते. काळजी करु नका आराध्या बच्चन लवकरच मोठी होणार आहे असं म्हटलं आहे.

यानंतर अभिनेत्री कम्या पंजाबी यांनी ट्रोलला ट्विटरद्वारे प्रतीउत्तर दिलं आहे की ट्रोल करणारे सर्वच आजारी असतात. तुमची बाजू घेवून मत मांडलं तर ती व्यक्ती चांगली, आणि जर सत्याची बाजू मांडली तर तुम्ही कोणाच्या मुलांना देखील वादात खेचता . मी या सर्व प्रसंगांना तोंड दिलं आहे.' कोणाला ट्रोल करणं तुमच्या सारख्या लोकांसाठी ट्रेंडच झाला आहे . असं ट्विट करत अभिनेत्री काम्या पंजाबीने त्या ट्रोलरला प्रतिउत्तर दिलं आहे

Updated : 17 Sept 2020 3:08 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top