Home > रिपोर्ट > मुस्लिम आहेत म्हणून “ते” आमच्या मुलांना शाळेत घेत नाही...

मुस्लिम आहेत म्हणून “ते” आमच्या मुलांना शाळेत घेत नाही...

मुस्लिम आहेत म्हणून “ते” आमच्या मुलांना शाळेत घेत नाही...
X

शहाबानो प्रकरणातून मुस्लीम महिलांसाठी काही चांगल्या गोष्टी घडल्या मात्र त्यांचे समूळ प्रश्न नष्ट झाले आहेत का? मुस्लिम महिलांना न्याय मिळावा, या दृष्टीने न्यायालयांनी विविध निवाडे आत्तापर्यंत दिले आहेत. परंतु या निर्णयानंतरही मुस्लिम महिलांचे प्रश्‍न कायमच राहिले आहेत. मुस्लीम स्त्रियांच्या सामाजिक प्रश्नांसदर्भात अजूनही दुर्लक्षच आहे. मुस्लीम समाज मागे राहण्याचे एक कारण आधुनिक शिक्षणाचा अभाव आणि त्यानंतर त्यांनी यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे "मुस्लीम सत्यशोधक मंडळ" हे आज किती तळागाळातील लोकांपर्यंत पोहचली आहे. आजही मुस्लिम महिलांसमोर शिक्षणाबरोबर आरोग्य,बेरोजगारी त्याचबरोबर महिलांची बुरखापद्धत, गुलामगिरी, पुरुषी मानसिकता हे अन्य विषयही महत्वाचे आहेत. अजूनही काही शिक्षणसंस्था फक्त धर्माच्या नावाखाली चालवल्या जात. मुस्लिम धर्म आहे म्हणून प्रवेश नाकारलं जात.

मंबईतील मुस्लिम महिलांचा आढावा घेतला असता नबीला सुमरा सांगतात की

"शाळेत मुलांना प्रवेश देत नाही, प्रत्येकवेळी दुसऱ्या वर्षी या असं शाळेकडून संगितलं जात. मुस्लिम आहेत म्हणून ते आमच्या मुलांचा स्वीकार करत नाही"

असं त्यांचं म्हणणं आहे. यामध्ये अनेक महिलांचं असं म्हणणं आहे की जे अत्याचार होतात ते फक्त मुस्लिम समाजावर होत आहेत.

शगुप्ता सैय्यद यांनी सांगितलं की

"NRC/CAB मुळे मुस्लिम समाजाला भारतापासून वेगळं केलं जातंय."

आजही महिलामुक्तीचे अनेक मुद्दे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तिहेरी तलाक' हा प्रश्न 'मुस्लिम महिलांचा' असा वेगळा करून डोळ्यांपुढे न ठेवता तो सर्व महिलांचा म्हणून बघितला जायला हवा. सर्वच समाजातील आणि धर्मांतील महिलांना अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर मॅक्सवूमनचा हा रिपोर्ट

https://youtu.be/Qq1iQutFddw

Updated : 4 Jan 2020 2:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top