Latest News
Home > News > ‘तर अनुराग सोबत सर्व संबंध तोडणारी पहिली व्यक्ती मी असेल’

‘तर अनुराग सोबत सर्व संबंध तोडणारी पहिली व्यक्ती मी असेल’

‘तर अनुराग सोबत सर्व संबंध तोडणारी पहिली व्यक्ती मी असेल’
X

अभिनेत्री पायल घोष हिने बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगीक अत्याचाराचे आपोर केले. या प्रकरणावर आता अभिनेत्री तापसी पन्नू हिने प्रतिक्रिया दिली. जर या प्रकरणात अनुराग दोषी सिद्ध झाला तर मी त्याच्यासोबतचे सर्व संबंध तोडून टाकेन अशी घोषणा तिने केली आहे.

मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत तिने अनुरागवर झालेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांवर भाष्य केलं. ती म्हणाली, “अनुराग स्त्रियांचा सन्मान करतो. आजवर कधीही त्याने महिलांसोबत गैरवर्तणुक केलेली नाही. समाजात वावरताना तो एखाद्या कठोर व्यक्तीसारखा भासतो, परंतु खरं तर तो खूप शांत आणि प्रेमळ स्वभावाचा आहे. त्याच्यावर केले जाणारे आरोप खोटे आहेत. आणि जर हे आरोप खरे सिद्ध झाले तर, मी अनुरागसोबतची मैत्री कायमची तोडून टाकेन.” अशी प्रतिक्रिया तापसीने दिली आहे.

दरम्यान, “अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असं ट्विट पायल घोषने केलं आहे.

Updated : 25 Sep 2020 11:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top