शत्रूवरही संसदेत बसण्याची वेळ येऊ नये - अनु आगा
Max Woman | 13 March 2019 11:43 AM IST
X
X
राज्यसभा सदस्यत्वाचा कालावधी हा माझ्यासाठी सर्वात वाईट काळ होता. माझ्या आयुष्याची सहा वर्षे तिथे वाया गेली. संसदेत कोणीही एकमेकांचा आदर करत नाही. शत्रूवरही संसदेत बसण्याची वेळ येऊ नये, अशा शब्दांत उद्योजिका आणि समाजसेविका अनु आगा यांनी निशाणा साधला. मतदारांनी योग्य आणि सक्षम लोकप्रतिनिधींचीच निवड करायला हवी. आपण ज्यांना निवडून दिले आहे, त्यांना परखडपणे प्रश्न विचारायला हवेत. योग्य राज्यकर्ते असतील तरच देशाचे भविष्य उज्ज्वल असेल, असा सल्लाही त्यांनी दिला.
जनसेवा फौंडेशनतर्फे मीट द स्टॉलवर्ट, भेटू या एका दिग्गजाला या कार्यक्रमांतर्गत अनु आगा यांची प्रकट मुलाखत पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.
Updated : 13 March 2019 11:43 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire