Home > रिपोर्ट > एका दिवसात 3 पदकं मिळवणारी भारतीय महिला

एका दिवसात 3 पदकं मिळवणारी भारतीय महिला

एका दिवसात 3 पदकं मिळवणारी भारतीय महिला
X

सर्व भारतीयांना प्रेरणा देणारी भोपाळची अंकिता श्रीवास्तव ने 17-24 ऑगस्ट 2019 दरम्यान न्यू कॅसल, युनायटेड किंगडम येथे ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीनं आयोजित वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्समध्ये 2 सुवर्ण पदक व 1 रौप्य पदक जिंकले. या विजयानंतर एका दिवसात 3 पदकं मिळवणारी ही पहिली भारतीय महिला आहे.

ज्या लोकांनी आपल्या शरीराचे अवयव दान केलेला असतो. तेच लोक वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्समध्ये भाग घेऊ शकतात. या पार्श्वभूमीवर देशाचं प्रतिनिधित्व करणारी ती भारताची सर्वात लहान स्पर्धक आहे. तिने 59 देशांमध्ये 2027 स्पर्धकांमधून, लाँग जंप आणि बॉल थ्रोमध्ये विजय मिळवला आहे. 100 मीटर स्प्रिंटमध्ये रौप्यपदक जिंकले आहे.

अंकिताने वयाच्या 20 व्या वर्षी आपल्या आईला लिव्हरचे 74 टक्के दान केले होते. ती एक उद्योजक, लेखक, राष्ट्रीय जलतरण, संगणक विज्ञान अभियंता आणि एक उत्तम वक्ता देखील आहे.

Updated : 17 Sept 2019 5:58 PM IST
Next Story
Share it
Top