Home > रिपोर्ट > अंगणवाडी सेविका, मदतनिसांची रिक्त पदे लवकरच भरणार- यशोमती ठाकूर

अंगणवाडी सेविका, मदतनिसांची रिक्त पदे लवकरच भरणार- यशोमती ठाकूर

अंगणवाडी सेविका, मदतनिसांची रिक्त पदे लवकरच भरणार- यशोमती ठाकूर
X

महिला बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी आज महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा व कामकाजाचा आढावा घेतला. त्याचबरोबर राज्यातील मागील ३ वर्षामध्ये जी पदं रिक्त होती त्या पदापैकी अंगणवाडी सेविका व मदतनीसांची 5 हजार 500 पदे तत्काळ भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. याची माहिती महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.केंद्र शासनाने याआधी मान्यता देऊनही ही अंगणवाडी केंद्रे अजूनही सुरु करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले. तेव्हा ही केंद्रे सुरु करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना मंत्री ठाकूर यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार राज्याच्या विविध भागात या नव्या अंगणवाड्या लवकरच सुरु करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

Updated : 18 Jan 2020 2:43 PM GMT
Next Story
Share it
Top