Home > रिपोर्ट > सानिया मिर्झाच्या बहिणीचा या क्रिकेटरच्या मुलाशी विवाह

सानिया मिर्झाच्या बहिणीचा या क्रिकेटरच्या मुलाशी विवाह

सानिया मिर्झाच्या बहिणीचा या क्रिकेटरच्या मुलाशी विवाह
X

टेनिस स्टार सानिया मिर्झाची बहिण अनम मिर्झाचं लग्न मोहम्मद अजहरुद्दीनचा मुलगा असदुद्दीनसोबत हैदराबादमध्ये झालं. अनम मिर्झा आणि मोहम्मद असदुद्दीन यांचा पारंपारिक पद्धतीने विवाह झाला. दोन्ही कुटुंबांचा क्रिडा जगतात वर्चस्व आहेच, सानियाने भारताचं नाव टेनिसमध्ये गाजवलं आहे, तर असदुद्दीनचे वडिल म्हणजे, अजहरुद्दीन हे भारतीय क्रिकेट संघाचे कॅप्टन होते.

सानियाने मिर्झाने लग्नाचे फोटो आपल्या ट्विटर हॅण्डल वरून शेअर केलं आहे. लग्नाच्या फोटोआधी प्री-वेडिंग इव्हेंटचे फोटोही सानियाने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या इव्हेंटमध्ये मेहंदी आणि इतर प्रथाही साजऱ्या करण्यात आल्या. सानियासोबत तिचा मुलगा इझान मिर्झामलिकही या लग्नामध्ये दिसला. अनम आणि असदच्या ग्रँड वेडिंगला कुटुंबातील लोकं आणि मित्र परिवार उपस्थित होता. त्याचबरोबर स्वागत समारंभाला अनेक सेलिब्रेटिनी हजेरी लावली.

https://www.instagram.com/p/B584sHTJpgc/?utm_source=ig_web_button_share_sheet


https://www.instagram.com/p/B56KoGxJRWb/?utm_source=ig_web_button_share_sheet

Updated : 13 Dec 2019 1:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top