Home > रिपोर्ट > संतापजनक : भर चौकात तरुणीला जाळलं, महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे का?

संतापजनक : भर चौकात तरुणीला जाळलं, महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे का?

संतापजनक : भर चौकात तरुणीला जाळलं, महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे का?
X

संपूर्ण महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणारी घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात घडलीये. एका शिक्षिकेला दोन जणांना जिवंत पेटवून दिल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. शहरातील नंदोरी चौकात ही घटना घडलीये. या घटनेत पीडित शिक्षिका ३० टक्के भाजली असून तिच्यावर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित शिक्षिका आज सकाळी सव्वा सातच्या सुमारास शाळेत निघाली असताना टू व्हिलरवरुन आलेल्या दोघांनी तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे नराधम तिथून निसटले पण त्यातील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

या घटनेने शहरात एकच खळबळ निर्माण झालीय. या घटनेनंतर पीडित शिक्षिकेला परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालय दाखल केले. पण तिची प्रकृती अधिक चिंताजनक असल्यामुळे तिला नागपूरला हलवण्यात आले आहे. दरम्यान भररस्त्यात शिक्षिकेला जाळण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्राला काळिमा फासणरा आहे. या घटनेच्या निमित्ताने कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत, तसंच मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी या घटनेत लक्ष घालावे आणि फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालावा अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केलीये.

Updated : 3 Feb 2020 11:39 AM GMT
Next Story
Share it
Top