Home > रिपोर्ट > धक्कादायक! तरुणीला भरचौकात पेट्रोल ओतून जाळले

धक्कादायक! तरुणीला भरचौकात पेट्रोल ओतून जाळले

धक्कादायक! तरुणीला भरचौकात पेट्रोल ओतून जाळले
X

एका तरुणीवर भरचौकात पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली आहे. ही तरुणी महाविद्यालयात शिक्षिका असून ती कॉलेजला जात असताना तिच्यावर हिंगणघाट येथील नंदेरी चौकात पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आले आहे. या तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान आरोपीने तरुणीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्यानंतर तात्काळ घटास्थळावरुन पळ काढला. पोलिस या आरोपीचा शोध घेत आहेत. नक्की हा प्रकार का घडला? याचा तपास पोलिस करत आहेत.

Updated : 3 Feb 2020 5:49 AM GMT
Next Story
Share it
Top