Home > रिपोर्ट > सोनियांचं रायबेलीतील मतदारांना भावनिक पत्र

सोनियांचं रायबेलीतील मतदारांना भावनिक पत्र

सोनियांचं रायबेलीतील मतदारांना भावनिक पत्र
X

आगामी काळ हा काँग्रेस पक्षासाठी कठीण असेल, मात्र या दिव्यातून काँग्रेस पक्ष नक्कीच पार पडेल असा विश्वास संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये रायबरेलीमधून सोनिया गांधी विजयी झाल्या. त्यावेळी त्यांनी रायबरेलीच्या मतदारांना पत्र लिहुन आभार मानले आहेत. यापत्रामध्ये त्यांनी काँग्रेसचा काळ खुप कठीण आहे असे या पत्राव्दारे कबुल केले.मात्र तुमचा विश्वास आणि पांठिबा असेल तर काँग्रेस पक्ष या दिव्यातूनही पार पडेल असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

रायबरेलीच्या मतदार संघाप्रमाणे काँग्रेस पक्षासह समाजवादी पक्ष, बहुजन समाज पार्टी, स्वाभिमान दल यांनीही माझ्या विजयासाठी हातभार लावला यासाठी मी त्यांचे देखील आभार मानत आहे. माझे आयुष्य खुल्या पुस्तकाप्रमाणे आहे. आणि तुम्ही माझे कुटुंब आहात. तुमच्यामुळे मला प्रेरणा मिळते, तिच माझी खरी संपत्ती आहे. मी रायबेलीतील माझ्या कुटुंबाची काळजी घेण्याचे प्रयत्न केले आहेत, असे सोनिया गांधी यांना पत्रामध्ये म्हटले आहे.ही लढाई कितीही दीर्घकाळ सुरू राहिली तरी, भारतीय संस्कृतीचा गाभा असलेल्या मूल्यांच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण करायला मी मागेपुढे पाहणार नाही असेही सोनिया गांधीनी पत्रामध्ये म्हटले आहे.

Updated : 27 May 2019 2:29 PM IST
Next Story
Share it
Top