Home > रिपोर्ट > ज्यावेळी माझ्यावर टीकेचे दगड मारले जातात…

ज्यावेळी माझ्यावर टीकेचे दगड मारले जातात…

ज्यावेळी माझ्यावर टीकेचे दगड मारले जातात…
X

मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांना अनेकदा सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागला आहे. मात्र कधी यावर भाष्य केलं नाही. पहिल्यांदाच अमृता फडणवीस यांनी त्यांच्यावर होणाऱ्या टीकेवर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांची पत्नी असण्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. टीकेचे जे दगड माझ्यावर मारले जातात. त्यातील रचनात्मक दगड महत्वाचे जे नकारात्मक आहेत त्याकडे लक्ष न दिलेले बरे असं अमृता यांनी परखडपडे सांगितले आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. उषा संजय काकडे यांच्या संस्थेतर्फे िवविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांच्या सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलही त्यांना विचारण्यात आलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील-नसतील, काही फरक पडत नाही! ते माणूस म्हणून कसे आहेत ते महत्वाचं आहे. देवेंद्र हे कायम माझ्यासोबत भक्कमपणे उभे असतात, असे मि.मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

Updated : 4 July 2019 3:29 AM GMT
Next Story
Share it
Top