Home > रिपोर्ट > मिसेस सीएमची प्रतिमा बदलणाऱ्या अमृता फडणवीस

मिसेस सीएमची प्रतिमा बदलणाऱ्या अमृता फडणवीस

मिसेस सीएमची प्रतिमा बदलणाऱ्या अमृता फडणवीस
X

अमृता देवेंद्र फडणवीस या सांस्कृतिक उन्नयन झालेल्या सांस्कृतिक अधिसत्ता असलेल्या कौटुंबिक घरातून येतात. अमृता फडणवीस यांनी पोस्ट केलेल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात येते. हे पाहून वाईट वाटले. राजकीय मराठा कुटुंबातील राजकीय क्षेत्रातील स्त्रियांची अमृता फडणवीस यांची तुलना करताना काळजी घ्यावी. अमृता या मनोरंजन क्षेत्रात करिअर करू पाहत आहेत. त्या गायिका आहेत, सेलिब्रिटी म्हणून त्यांचा वावर उठून दिसतो. तर सामाजिक राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या मराठा परिवारांमधील स्त्रिया या राजकीय नेत्या, त्यांच्या पत्नी वा सून म्हणून वावरत आहेत. याचा उघड अर्थ असा की, राजकीय क्षेत्रातील अपवाद वगळता सर्वार्थाने पुरुषांनी महाराष्ट्राचा विचार करता मराठा राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील महिलांवर अनेक प्रकारच्या मर्यादा नकळतपणे राजकीय व्यवस्थेच्या चौकटी व मर्यादांमुळे लादल्या गेल्या, तशी चौकट मोडण्याचा अमृता फडणवीस यांनी प्रयत्न केलाय, किंबहुना त्या स्वतंत्र व्यक्ती म्हणून पुढे येत आहेत. हे विशेष अभिनंदनीय व फर्स्ट लेडी सारखे मिसेस सीएम म्हणून शहरी मतदारवर्गात प्रोत्साहन देणारं आहे. मराठा जात वर्गात अनेक छटा आहेत. देशमुखांच्या घरातील महिलांनी असेच वागावे, पाटलांच्या घरातील महिलांनी असे, कुणब्यांच्या घरातील असे, इ. सांस्कृतिक पदर समोर येतात. मात्र अमृता फडणवीस यांच्यामुळे मुख्यमंत्र्यांची बायको किंवा राजकर्त्याची बायको म्हणून असलेली प्रतिमा बदलत चाललेली आहे. डोक्यावर पदर घेऊन घरात बसण्यापेक्षा त्यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण करुन समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.

हर्षव लोहकरे, सामाजिक कार्यकर्ते

Updated : 8 Jun 2019 11:18 AM GMT
Next Story
Share it
Top