मराठी बिग बॉस चे ऑडिशन वगैरे सुरु आहेत काय? शिवसेनेचा अमृता फडणवीसांना टोला
Max Woman | 24 Dec 2019 12:26 PM IST
X
X
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. अमृता फडणवीस यांच्या टीकेला शिवसेनेने त्यांच्याच शैलीत उत्तर दिलं आहे.युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी “अमृता फडणवीस यांचे बिग बॉससाठी प्रयत्न सुरु आहेत,” असा टोला ट्विटवरुन लगावला आहे.
मराठी बिग बॉस चे ऑडिशन वगैरे सुरु आहेत काय? 'माजी' झाल्यामुळे आता कोणी इंडियन आयडॉल ला उभं पण करणार नाही. बाकी बिग बॉस साठी चालू देत जोरदार.. https://t.co/mSEIPXGUAJ
— Varun Sardesai (@SardesaiVarun) December 22, 2019
शिवसैनिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “मराठी बिग बॉसचे ऑडिशन वगैरे सुरु आहेत काय? ‘माजी’ झाल्यामुळे आता कोणी इंडियन आयडॉलला उभं पण करणार नाही. बाकी बिग बॉससाठी चालू देत जोरदार,” असे ट्विट सरदेसाई यांनी केले आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले यांनी ‘सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादा पेशवेंची बुद्धी भ्रष्ट केली’, असा टोला लगावला आहे.
इतिहासात रघुनाथदादा पेशवे हे बुद्धिमान, पराक्रमी असल्याचे सुरुवातीचे उल्लेख आहेत. सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. त्यांनी नैतिकतेचाच मुडदा पाडला आणि राघोबा खलनायक ठरले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो! #ठाकरेठाकरेच! #आजच्याआनंदीबाई https://t.co/5GWTWJaCe6
— Amey Ghole (@AmeyGhole) December 22, 2019
“इतिहासात रघुनाथदादा पेशवे हे बुद्धिमान, पराक्रमी असल्याचे सुरुवातीचे उल्लेख आहेत. सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. त्यांनी नैतिकतेचाच मुडदा पाडला आणि राघोबा खलनायक ठरले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो!,” असं ट्विट घोले यांनी केलं आहे.
अमृता फडणवीस यांनी २२ डिसेंबर ला केलेलं हे ट्विट
https://twitter.com/fadnavis_amruta/status/1208789575688216578?s=20
“खरं आहे देवेंद्र फडणवीसजी… त्याचप्रमाणे केवळ ठाकरे आडनाव लावल्यानेही कोणी ठाकरे होत नाही… त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावं लागतं… एखाद्याने स्वतःचे कुटुंब आणि सत्तेपेक्षा जनता आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्याची गरज असते,” असं ट्विट केलं होतं.
Updated : 24 Dec 2019 12:26 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire