Home > रिपोर्ट > मुंबईत होणार महिलांचे तीन दिवसीय अधिवेशन

मुंबईत होणार महिलांचे तीन दिवसीय अधिवेशन

मुंबईत होणार महिलांचे तीन दिवसीय अधिवेशन
X

अखिल भारतीय जनवादी महिला संघटना यांच्या वतीने २७ ते ३०डिसेंबर या दरम्यान अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या बारावे राष्ट्रीय अधिवेशन मुंबईतील साबू सिद्दिक पॉलिटेक्निक हॉल ,भायखळा ठिकाणी पार पडणार आहे. आणि या संदर्भात एक पत्रकार परिषद पार पडली.

' संविधानाचे रक्षण करू, महिला अधिकाऱ्यांचे संवर्धन करू, एक होऊन, एकजुटीने लढू सारे मिळून पुढे जाऊ ...या अधिवेशनाचे हे घोषवाक्य आहे . या अधिवेशनासाठी संपूर्ण देशभरातून अनेक महिला एकत्र येणार आहेत .महिलांच्या अनेक विषयांना हात घालत , कर्तबगार महिलांचा गौरव केला जाणार आहे .या अधिवेशनाचे उद्घाटन २७ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर या उपस्थित राहणार आहेत, तर बीजभाषण संघटनेच्या मार्गदर्शक माजी खासदार वृंदा करात या करणार आहेत.

या पत्रकार परिषदेमध्ये होणाऱ्या अधिवेशनात बाबत अध्यक्ष मालिनी भट्टाचार्य तसेच सरचिटणीस मरियम ढवळे यांनी संपूर्ण माहिती दिली.

https://youtu.be/OCSAaDgBshg

Updated : 24 Dec 2019 12:03 PM GMT
Next Story
Share it
Top