बोट दुर्घटनेतील प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या प्रशांत घरत यांचा सत्कार
Max Woman | 16 March 2020 9:48 PM IST
X
X
भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग तालुकाच्या वतीने बोट दुर्घटनेत अनेक प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या पोलीस नाईक प्रशांत घरत यांचा सत्कार आज करण्यात आला. शनिवारी अलिबागला जाणऱ्या बोटीला अपघात झाला होता. मात्र प्रशांत घरत यांच्या समयसुचकतेमुळे बोटीतील ८८ प्रवाशांचे प्राण वाचले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही प्रशांत यांचा सत्कार करत त्यांच्या कार्याचं कौतुक केलं.
भूमाता ब्रिगेडच्या वतीने त्यांना ‘शौर्य पुरस्काराने’ सन्मानित करण्यात यावे अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात येणार आहे. प्रशांत घरत यांचा सत्कार करताना भुमाता ब्रिगेडचे अलिबाग तालुका अध्यक्ष हर्षल पाटील , रुपेश ठाकूर, महेश मोकल, विशाल मोकल , सुवर्णा कोळी, रंजना कोळी, आणि संदेश म्हात्रे ,सुर्यवंशी माळी पदाधिकारी उपस्थित होते.
Updated : 16 March 2020 9:48 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire