औरंगाबाद मधील 'ती' महिला १० दिवसात झाली कोरोनामुक्त
X
त्यामुळे १० दिवसांच्या उपचारानंतर महिला कोरोनामुक्त झाल्याचं सांगत डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. त्यांना आता 'होम क्वारंटाईन' ठेवलं जाणार आहे.1
- राज्यात कोरोना बाधितांची संख्या शंभर पार
- CoronaVirus: 'या' आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ११ महत्त्वपुर्ण सूचना
- चीन, इटली नंतर ‘हा’ देश आहे कोरोना चं लक्ष्य
या प्राध्यापक महिलेला रशियातून आल्यानंतर कोरोना झाल्याचं तपासणीत सिद्ध झालं होतं. त्यानंतर १३ मार्चपासून त्यांच्यावर शहरातल्या धूत रुग्णालयात उपचार सुरू होते. यावेळी त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाली होती. एक आठवडा उपचार केल्यानंतर महिलेच्या लाळेचे नमुने पुन्हा तपासण्यात आले. तेव्हा त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला.
रुग्णाबाबत जे तातडीने निर्णय घेतले ते महत्त्वाचे ठरले असल्याचं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. तातडीने रिपोर्टिंग, वेळेत डायग्नोसीस, तातडीने केलेलं आयसोलेशन आणि योग्य उपचार यामुळे महिलेची प्रकृती सुधारली असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं.
विशेष म्हणजे या प्राध्यापिकेच्या संपर्कात आलेल्या इतर प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचीही डॉक्टरांनी तपासणी केली होती. मात्र त्यापैकी कोणालाही कोरोनाची लक्षणं दिसून आली नाहीत.