निर्भयाच्या आईला इंदिरा जयसिंह यांचा अजब सल्ला
X
गेली अनेक वर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या निर्भयाच्या कुटुंबाने या निकालावर अखेर समाधान व्यक्त केले आहे. १ फेब्रुवारी रोजी पहाटे सहा वाजता या चारही दोषींना फाशी दिली जाणार आहे. मात्र हे प्रकरण पुन्हा एकदा वेगळ्या अर्थाने उफाळून आलं आहे. ते म्हणजे ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांच्या वक्तव्यामुळे. "निर्भयाच्या आईनं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं अनुकरण करून दोषींना माफ करावं" असा अजब सल्ला ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी दिला असल्यामुळे हा वाद पुन्हा चर्चेत आलं आहे. मात्र दुसरीकडे शिक्षेला होत असलेल्या विलंबावर निर्भयाची आई आशा देवी यांनी संताप व्यक्त केला असून इंदिरा जयसिंह यांच्या वक्तव्याला त्यांनी सल्ला देत “तुमच्या सारख्यांमुळेच बलात्कार पीडितांना न्याय मिळत नाही”, असं म्हणत निर्भयाच्या आईने राग व्यक्त केला आहे. ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी एक ट्विट करून 'आशा देवींचं दु:ख आणि वेदना मी समजू शकते. तरीही मी त्यांना सोनिया गांधी यांचं अनुकरण करायला सांगेन. सोनियांनी ज्याप्रमाणं त्यांचे पती राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील दोषी नलिनी हिला माफ केलं आणि आपण मृत्युदंडाच्या शिक्षेविरोधात असल्याचं सांगितलं होतं, तोच कित्ता आशा देवी यांनी गिरवावा,' असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
https://twitter.com/IJaising/status/1218195956551708673?s=20