Home > रिपोर्ट > 'आई संपादक झाली', आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया...

'आई संपादक झाली', आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया...

आई संपादक झाली, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया...
X

दैनिक ‘सामना’च्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. याविषयी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘आई संपादक झाली आनंदाची गोष्ट आहे. अर्थात ही मोठी जबाबदारी आहे, आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत. ममहाराष्ट्रभर चांगली काम करण्याचा प्रयत्न करु’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’च्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची निवड झाल्यामुळे सामनाला पहिल्या महिला संपादक मिळाल्या आहेत. यापूर्वी सामनाचे संपादकपद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे होते. उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी असल्यामुळे त्यांनी संपादक पदाचा राजीनामा दिला होता. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. शिवसेनेची राजकीय भुमिका आणि विचार राऊत प्रखरपणे मांडत आहेत.

Updated : 1 March 2020 12:03 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top