Home > रिपोर्ट > अभिनेत्री दिपाली सय्यद शिवसेनेत

अभिनेत्री दिपाली सय्यद शिवसेनेत

अभिनेत्री दिपाली सय्यद शिवसेनेत
X

प्रसिद्ध अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. मुंब्रा-कळवा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचं त्यांना आव्हान असणार आहे.

साकळाई पाणी योजनेच्या अध्यक्ष, दिपाली सय्यद यांनी ३५ गावांच्या पाणी प्रश्नासाठी त्या आमरण उपोषण केलं होतं. तसेच अनेक सामाजिक कार्यामुळे त्या नेहमीच चर्चेत राहील्या आहेत. कळवा-मुंब्रा मतदारसंघात मुस्लिम मतदारांचं प्राबल्य आहे. त्यामुळे शिवसेनेनं सय्यद यांना पक्षात घेऊन जितेंद्र आव्हाड यांच्यापुढे तगडं आव्हान उभं केलं असल्याची चर्चा रंगत आहे.

courtesy : social media

Updated : 4 Oct 2019 7:35 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top