Corona Virus च्या संकटात का होतोय 'काय_सांगशील_ ज्ञानदा?' ट्रेंड व्हायरल
X
देशभरातून कोरोना व्हायरसला हद्दपार करण्यासाठी (IndiaFightsCorona) २१ दिवसांचा लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. डॉक्टर, पोलिस आणि अत्यावश्यक सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांसह मीडीया कर्मचारीही या संकटकाळात आपला जीव धोक्यात घालून काम करताना दिसत आहेत. या लॉकडाऊनमध्ये (21daylockdown) घर बसल्या नेटकऱ्यांना चांगलाच वेळ मिळाला असून आपल्या कल्पक मीम्सच्या माध्यमातून सोशल मीडीयावर ‘#काय_सांगशिल_ज्ञानदा ’ हा ट्रेन्ड जोरदार सुरु आहे.
मात्र, हा ट्रेंड का सुरु आहे याविषयी अजूनही अनेकांना काहीच कल्पना नाही. एकीकडे मोठया प्रमाणात मीम्स व्हायरल होत आहेत पण ज्ञानदावर मीम्स का बनतायत याची माहिती नाही. पाहुयात असेच काही मजेदार मीम्स...
राज्यभरात लॉकडाऊन चालू असताना ज्ञानदा यांच्या फॅन्सची भलतीच वाढ झाल्याचं दिसतंय. सर्वच मीम्स मध्ये नेटकऱ्यांनी फक्त ज्ञानदा यांच्या बातम्या ऐकण्यासाठीच आणि त्यांना पाहण्यासाठी उत्सुक असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ज्ञानदा काय सांगशील? असं म्हणतं अनेकांनी ज्ञानदावर मजेशीर कविताही रचल्या आहेत. त्यापैकीच एक ही कविता...
ज्ञानदाचा सहकारी प्रसन्ना जोशी यांच्यासोबतचा मीमही तुफान व्हायरल झाला आहे. याच मीमला प्रसन्ना जोशी यांनीही आपल्या फेसबुक वॉल वर पोस्ट करत तुझ्यावरचे मीम्स पाहून कसं वाटतंय... #काय_सांगशील_ज्ञानदा? असा सवाल केला आहे.
ज्ञानदा सर्व नागरिकांना घरात बसण्याची अपील करत आहे. यावरही 'ज्ञानदाने बोला बसने का मतलब बसने का' अशी मीम व्हायरल होतेय.
ज्ञानदा का होतेय नेटकऱ्यांकडून ट्रोल?
खरं तर या ट्रोलींगला जनता कर्फ्यू च्या दिवसापासून म्हणजेच २२ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. यादिवशी च्या क्षणाक्षणाच्या अपडेट प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व न्यूज चॅनेल्स सुध्दा आघाडीवर होते.
प्रेक्षकांना घरी राहण्याचा संदेश जावा म्हणून मराठी वृत्तवाहिन्यात आघाडीवर असणाऱ्या ABP Majha या चॅनेल ने आपल्या अँकर्स कडून थेट त्यांच्या राहत्या घरातूनच सर्व बुलेटिनचं प्रसारण केलं. यावेळी ज्ञानदाने घरात किचनमधूनच काम करतानाच प्रतिक्रीया दिली होती. यानंतर सोशल मीडीयावर हे प्रकरण सुरु झालं आणि मीम्सचा पाउस पडला होता.
नागरिक आणि ट्रोलर्सना ज्ञानदा सांगतेय की,
“जगभरातील परिस्थिती आपण पाहतोय, इटलीत काय झालय स्पेन मध्ये काय झालंय, जर्मनी कुठल्या संकटातून जातेय, अमेरिका असो किंवा इतर बाकीचे देश, कोरोनाचे संकट हे महाभयंकर आहे. या संकटाला आपण गांभीर्याने घ्यायला पाहीजे.कोरोनाला रोखण्यासाठी सरकार आणि आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहेत. पण तुमची माझी साथ मिळणं खुप गरजेचं आहे. घराबाहेर अजिबात पडू नका असं ज्ञानदा तुम्हाला सांगतेय.
तुमच्या स्वच्छतेची काळजी घ्या असं ज्ञानदा तुम्हाला सांगतेय. हात वेळोवेळी सॅनिटायझरने स्वच्छ करा आणि जर अत्यावश्य़क सेवेत असाल तरच घराबाहेर पडा. कारण तुम्ही जर तुमची काळजी घेतली नाही तर अख्ख्या कुटुंबाला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे ज्ञानदा एवढचं सांगतेय की सरकारी सुचनांचं पालन करा.”