Home > रिपोर्ट > शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यापासून १२ वर्षीय मुलीला अडवलं

शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यापासून १२ वर्षीय मुलीला अडवलं

शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यापासून १२ वर्षीय मुलीला अडवलं
X

एका १२ वर्षीय मुलीला केरळच्या सबरीमला मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखल्याची घटना समोर आली आहे. ही मुलगी मुळची पदुच्चेरी येथील रहिवासी असून ती तिच्या वडिलांसोबत भगवान अयप्पा स्वामींचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात आली होती. तेव्हा मंदिराच्या महिला सुरक्षा रक्षकांनी तिला अडवल्याचं बोललं जात आहे.

शबरीमला मंदिरात १० ते ५० वर्षांच्या महिलांना प्रवेश देण्यावरून वाद सुरू आहे. हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंतही गेला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार सध्या सर्व वयोगटातील महिला मंदिरात प्रवेश करू शकतात. असं असलं तरी महिलांना अडवलं जात असल्याचं समोर आलं आहे.

ऑनलाईन नोंदणीमध्ये म्हणजेच 'Virtual Queue Facility’ मध्ये या मुलीचं वय १० वर्ष नोंदविण्यात आलं होत. परंतु ओळखपत्रावर तिचं वय १२ वर्ष असल्याचं दिसून आलं. काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारीत केलेल्या दृष्यांमधून असं दिसून आलं की मुलीचे वडील आणि इतर लोक दर्शनासाठी पुढे जात असताना ही मुलगी रडायला लागली आणि 'मलाही पुढे जायचं आहे' अशी विनवणी तिने पोलिस अधिकाऱ्यांकडे केली परंतु तिला पुढे जाऊ दिलं गेलं नाही.

Updated : 20 Nov 2019 12:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top