वर्ध्यात 9 वर्षीय बालिकेवर 55 वर्षाच्या नराधमाचा बलात्कार, आरोपी फरार
X
निर्भया प्रकरणानंतर आरोपींना फाशी होण्यास काही अवधी असतांना, हैदराबाद प्रकरणाची शाई सुकत नाही तोच प्रकार वर्धा जिल्ह्यातील गांधी जिल्ह्याच्या संतांची कर्मभूमी व जन्मभूमी असलेल्या शांती पूर्ण असलेल्या आर्वी शहरात एका 55 वर्ष नराधमाने एका नाबालिक कोवळ्या अवघ्या 8 ते 9 वर्षाच्या बालिकेवर बलात्कार केल्याच्या घटनेने आर्वी शहरात संतापाचे वातावरण झाले आहे.
आर्वी शहरातील जनता नगर वर्डातील एका पतीपासून विभक्त असलेल्या व आई वडिलांपासून वेगळी राहत असलेली महिला भाड्याच्या घरात राहत असून मोल-मजुरी करून 3 मुलींचा सांभाळ करीत आहे.आरोपी सुरेश गभणे वय 55 वर्ष हा नराधम पीडित मुलीशी जवळीक साधून तिला खाऊचे आमिष दाखवून तिच्याशी अश्लील चाले आरोपी सुरेश गभणे याने केली. हा आरोपी पुरुशुमल चौक येथील हनुमान मंदिरातील निर्जन जागी सायंकाळचे सुमारास त्या बालिकेला बोलावून अश्लील वर्तन करीत होता.
सदर प्रकार 8 ते 15 दिवसापासून होत असल्याचे पीडितेच्या आईकडून समजलं. सदर प्रकार पीडितेच्या आईला एका महिलेने सांगितलं असता बालिकेची आईने थेट पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या बालिकेची देखल घेत तात्काळ वैद्यकिय तपासाकरिता नेण्यात आले यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला असून घटना स्थळांचा पंचनामा व चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, पोलीस निरीक्षक संपत चव्हाण अधिक तपास करीत आहेत. त्याचबरोबर फरारी आरोपीला पकडण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून सध्या शहरात व घटनास्थळ परिसरात तणावाचे वातारण असल्याचे दिसते.
https://youtu.be/xGNj4SW9yRM






