भारतीय शेतीत ६५ टक्के वाटा हा महिलांचा...
Max Woman | 11 Jun 2019 12:54 PM IST
X
X
शेतीचा शोध महिलांनी लावला, असं आपण शाळेत शिकलो आहे. पण तुम्हाला हे माहितीय का? की भारतातील पिकलागवडीच्या आधीपासून ते कापणीनंतरच्या सर्व शेतीच्या प्रक्रियेमध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग आहे. खरे तर याची आकडेवारी काढायची म्हटल्यास शेतीच्या सर्व प्रकारच्या कामातील ७५% वाटा या महिला उचलतात. याचा अर्थ दररोज दोन वेळ आपल्या ताटात वाढलं जाणारं अन्न हे प्रामुख्याने महिलांच्याच कष्टाचीचं देण आहे. भारतातील शेतीच्या एकूण कामातील ६५% वाटा या महिला उचलतात.
असं असलं तरीही, बहुतांश महिलांच्या नावावर स्वतःच्या मालकीची जमीन नाही. अथवा जमिनीचे कसलेही हक्कही नाहीयत, हेही तितकच विदारक वास्तव आहे. २०१६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतात फक्त १४% महिलांच्या नावावर स्वतःच्या मालकीची जमीन आहे. इतकच नव्हे तर, महिलांना शेतात राबून मिळणारी मजुरी ही पुरुषांच्या मजुरीच्या तुलनेत १.४ पटीने कमी आहे. असं असलं तरीही, २००१ ते २०११ च्या दरम्यान, मजुरी करणाऱ्या महिलांच्या संख्येत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचं कारण असं की, शेती व्यवसायावरील वाढते संकट आणि त्यामुळे त्यातून मोलमजुरीसाठी शहरी भागाकडे होणारे पुरुषांचे वाढते प्रमाण अशा अनेक कारणांमुळे अधिकाधिक महिलांना शेतात मजुरी करण्यावाचून पर्याय उरत नाही. या साऱ्या परिस्थितीचा धांडोळा घेऊनच २०१७ मध्ये केंद्रीय कृषीकल्याण मंत्रालयाने असे जाहीर केले की, खात्याच्या सर्व योजनांमध्ये ३०% पैश्यांची तरतूद ही खास शेती क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी म्हणूनच राखीव ठेवण्यात येईल. या तरतुदीच्या अंमलबजावणीकडे भारतातील शेती क्षेत्रात दिवसरात्र काबाडकष्ट करणाऱ्या महिलांच्या स्थितीत सुधारणा होण्यासाठीचा उपाय म्हणून पाहिले जात आहे..
म्हणून महिलांना शेतीच्या निर्माता म्हणतात...
आदिमानवाला जेव्हा अन्नधान्याचा शोध लागला तेव्हा महिलांना रानात कणसाला दाणे लगडल्याचे दिसले. त्यांनी ते पक्व झाल्यावर काही उकडून खाऊन, काही इतस्ततः फेकून दिले अन् पुन्हा पावसानंतर मुबलक ज्वारीची कणसं लगडून आलेले पाहिले. ते काढून त्यांनी ते शिजवून खाल्ले. इथे शेतीच्या शोधाची सुरवात म्हणता येईल. त्यापूर्वी तो प्राण्यांच्या मांसावर, कंदमुळांवर जगत होता.
(शब्दांकन - विनायक होगाडे)
Updated : 11 Jun 2019 12:54 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire