Home > News > देशातील 62% महिला करतात सेक्ससाठी मोबाईलचा वापर...

देशातील 62% महिला करतात सेक्ससाठी मोबाईलचा वापर...

देशातील 62% महिला करतात सेक्ससाठी मोबाईलचा वापर...
X

देशातील 62 टक्के महिला लैंगिक संबंधांसाठी मोबाइलचा वापर करत असल्याचं दिसून आलं आहे. या महिला डेटींग अॅपच्या सहाय्याने पार्टनरच्या शोध घेत असतात. यालाच सेक्सटींग असे म्हणतात. सेक्सटींग म्हणजे सेक्स फोटो, व्हिडीओ, मेसेज आपल्या मोबाईल मधून दुसऱ्याला पाठवणे. याला सोप्या भाषेत सेक्स चॅटींग असंही म्हणता येइल.

हा सर्वे मोबाइल सेक्स टेक या अॅपने केला असून तो पीएलओएस वन या सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. या सर्वेसाठी 191 देशांतील 1,30, 885 महिलांचा अभ्यास करण्यात आला. यात 23,093 भारतीय महिलांचा सहभाग होता. या अभ्यासात महिलांना ऑनलाइन प्रश्न विचारण्यात आले होते.

थोड्या वेळासाठी डेटींग पार्टनर शोधणाऱ्या 44% महिलांचा समावेश यात आहे. 37% महिला दिर्घ काळासाठी पार्टनरच्या शोधात आहेत. तर 24% महिला गरजे नुसार पार्टनरचा शोध घेत असल्याचं समोर आलं आहे.

डेटींग पार्टनर शोधणाऱ्या महिलांमधे 18 ते 54 वयोगटातील महिलांचा समावेश असून 21 ते 24 वयोगटातील महिलांची संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे यातील 24% महिलांनी फक्त एंजॉयमेंटसाठी पार्टनरच्या शोधात असल्याचं म्हटलं आहे. लैंगिक असमानता असलेल्या देशांमधील महिलांचं सेक्सटिंग करण्याचं प्रमाण चारपट जास्त आहे.

Updated : 21 Sep 2020 3:44 PM GMT
Next Story
Share it
Top