Home > रिपोर्ट > 2019loksabahaelection -तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला महिलांची मांदियाळी

2019loksabahaelection -तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला महिलांची मांदियाळी

2019loksabahaelection -तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला महिलांची मांदियाळी
X

आज लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून राज्यातील 14 जागांसाठी हे मतदान सुरु आहे. दिग्गजांचं भवितव्य मतयंत्रातात बंद होणार आहे. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या 47 टक्के असल्यामुळे साताऱ्यातील मतदानाला महत्त्वाचं मानलं जात आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे नरेंद्र पाटील विरोधात राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले अशी लढत होत आहे.

पहिले दोन टप्पे पार पाडल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात 249 उमेदवारांमध्ये 19 महिला उमेदवार आहेत.त्यात सर्वाधिक (चार) महिला उमेदवार बारामतीमध्ये आहे

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव,रावेर, अहमदनगर मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, कोकणातील रायगड रत्नागिरी-सिंधुदुर्ग या 14 मतदारासंघात मतदान होत आहे.

Updated : 23 April 2019 3:11 AM GMT
Next Story
Share it
Top