Home > पर्सनॅलिटी > सेल्सगर्ल ते संरक्षणमंत्री, निर्मला सीतारमण यांचा थक्क करणारा प्रवास

सेल्सगर्ल ते संरक्षणमंत्री, निर्मला सीतारमण यांचा थक्क करणारा प्रवास

सेल्सगर्ल ते संरक्षणमंत्री, निर्मला सीतारमण यांचा थक्क करणारा प्रवास
X

मागच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री राहीलेल्या निर्मला सीतारमण यांनी पुन्हा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्याकडे संरक्षण खात्याचा कारभार कायम ठेवला जाऊ शकतो.

तामिळनाडूच्या सामान्य कुटुंबात जन्म

तामिळनाडूच्या मदुराईमध्ये 18 ऑगस्ट 1959 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रेल्वे विभागात नोकरी करत होते तर आई गृहीणी होत्या. तामिळनाडूच्या तिरुचिरापल्लीमध्ये त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी अर्थशास्त्रात पदवी संपादन केली. दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर इंडो-युरोपियन टेक्सटाईल ट्रेडमध्ये पी.एचडी संपादन केली.

सेल्सगर्ल म्हणूनही केलं काम

आपल्या शिक्षणादरम्यान निर्मला यांनी अनेक ठिकाणी काम केलं. पतीसोबत लंडनमध्ये रहात असताना त्यांनी एका घर सजावटीच्या दुकानात सेल्सगर्ल म्हणूनहू काम केलंय. त्यानंतर त्यांना पाईस वॉटरहाऊस नावाच्या कंपनीत मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली. भारतात परतल्यानंतर हैद्राबादमध्ये सेंटर फॉर पब्लिक पॉलिसी मध्ये त्यांनी डेप्युटी डायरेक्टर म्हणून काम पाहिलं.

राजकारणाचा चढता आलेख

2008 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. दोनच वर्षांत त्या पक्षाच्या प्रवक्त्या बनल्या. 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांना राज्यमंत्री करण्यात आलं. 3 डिसेंबर 2017 ला केंद्रीय कॅबिनेटमधल्या बदलानंतर बढती देऊन त्यांच्यावर संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर संरक्षण मंत्री होणाऱ्या निर्मला या दुसऱ्या महिला होत्या.

संरक्षण मंत्री म्हणून त्यांची कारकिर्द चांगलीच गाजली. राफेल प्रकरणावरुन काँग्रेस देशभर रान उठवत असताना त्यांच्यावरही अनेक आरोप झाले. पण विरोधकांच्या प्रत्येक आरोपांना निर्मला यांनी तितक्यात आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं. माध्यमांसमोर येत सरकारची बाजू मांडली. इस्त्राईल आणि अमेरिकेसोबत झालेल्या संरक्षण करारामध्ये त्यांची महत्वाची भूमिका राहीलेली आहे. त्यांच्या या स्वभावामुळं आणि कामगिरीमुळे त्यांना पुन्हा एकदा मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलंय.

Updated : 31 May 2019 5:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top