सुनेत्रा पवारांचे विठ्ठलाकडे मागणे
Max Woman | 3 July 2019 12:15 PM GMT
X
X
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळयाला सुरवात झाली असून यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी , पदाधिकारी यांच्याकडून मुख्य दिंडीतील शेकडो वारकऱ्याना मृदंग भेट देण्यात आली .दरम्यान अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी देखील दर्शन घेतले. श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन आज बारामती मध्ये झाले , पालखी सोहळ्यामुळे सर्व परिसर भक्तिमय झाल्याचं पहायला मिळाले. यावेळी शहरातील अनेक नागरिक संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पाहण्यासाठी आले होते, सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. यावेळी महाराष्ट्रातील बळीराजा दुष्काळात अडकला असताना बळीराजाला सुखाऊदे असे साकडे त्यांनी विठ्ठलाकडे घातले.
https://youtu.be/OVpPkl5iYv0
Updated : 3 July 2019 12:15 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire