Home > रिपोर्ट > सल्लूमियाचे 'वजन' घटले

सल्लूमियाचे 'वजन' घटले

सल्लूमियाचे वजन घटले
X

वयाच्या ५४ व्या वर्षीही 'आहे अजून तरुण मी, असंच आपल्या देहबोलीतून सूचित करणारा सुपरस्टार सलमान खानचे वजन ७ किलोने घटले आहे. लग्न जुळत नाही किंवा लग्न कधी करणार? या माध्यमातून उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नाच्या भडिमारामुळे नाही. तर 'दबंग ३' या चित्रपटासाठी तयारीचा भाग म्हणून सलमान जीममध्ये व्यायाम करत असल्याचे फोटो त्यानेच सोशल मीडियावर टाकले आहेत. पिळदार शरीरयष्टीचा सलमान आजही जगभरातील महिला आणि तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे तो त्याच्या फिटनेसमुळॆ.

सलमान खानची मसल पावर पाहून असंख्य तरुणांनी जिमची वाट धरली हेही खरे. त्यामुळेच फिटनेसवर भर देणारा सलमान आता जिममध्ये मेहनत करताना दिसतो आहे. 'दबंग ३' मध्ये सलमान पुन्हा खाकीत दिसणार आहे. पोलिसात भरती होण्याआधीची चुलबुल पांडेची धडपड या चित्रपटात दिसणार आहे. या भूमिकेत सलमानला तरुण दिसावे लागणार आहे. 'दबंग ३' हा चित्रपट २० डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. 'दबंग ३' मध्ये सलमानसोबत... थप्पड से डर नही लगता.. म्हणणारी सोनाक्षी सिन्हाही झळकणार आहे.

https://twitter.com/BeingSalmanKhan/status/1142440790767099904

Updated : 4 July 2019 10:14 AM GMT
Next Story
Share it
Top