Home > रिपोर्ट > शोएबच्या निवृत्तीनंतर सानिया मिर्झाची भावनिक पोस्ट

शोएबच्या निवृत्तीनंतर सानिया मिर्झाची भावनिक पोस्ट

शोएबच्या निवृत्तीनंतर सानिया मिर्झाची भावनिक पोस्ट
X

वर्ल्डकप २०१९ मधून पाकिस्तान बाहेर झाल्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार अष्टपैलू क्रिकेटपटू शोएब मलिकने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यानंतर पत्नी सानिया मिर्झाने भावनिक टि्वट केले आहे."प्रत्येक गोष्टीला शेवट असतो पण आयुष्यात प्रत्येक शेवटाला एक नवीन सुरुवात होत असते. गेली २० वर्ष अभिमानाने तू तुझ्या देशासाठी खेळलास. तू जे काही मिळवलेस आणि आज तू जो कोणी आहेस त्याबद्दल मला आणि इझहानला तुझा अभिमान आहे असे सानियाने टि्वटमध्ये म्हटले आहे." ७ वर्षीय शोएब मलिकने पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व केले आहे. कसोटी क्रिकेटमधून त्यांनी २०१५ ला निवृत्ती जाहीर केली होती.

https://twitter.com/MirzaSania/status/1147248228116471808

Updated : 6 July 2019 7:24 AM GMT
Next Story
Share it
Top