Home > रिपोर्ट > शाहांच्या भेटीनंतर नवनीत कौर राणा भाजपमध्ये प्रवेश करणार ?

शाहांच्या भेटीनंतर नवनीत कौर राणा भाजपमध्ये प्रवेश करणार ?

शाहांच्या भेटीनंतर नवनीत कौर राणा भाजपमध्ये प्रवेश करणार ?
X

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना पराभूत करत नवनीत कौर राणा विजयी झाल्या. या निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादी त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र आता त्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अश्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने या चर्चेला उधाण आलेलं आहे. मात्र ही भेट अमरावतीच्या विकास कामांतर्गत घेतल्याचे खासदार नवनीत कौर राणा यांनी सांगितले. मात्र त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी

"बदल होत असतात"

अशी प्रतिक्रिया दिल्याने या भेटीची वेगळीच चर्चा सुरु झाली. महाराष्ट्रातील आगामी विधान सभेचा विचार केला तर येणाऱ्या चार महिन्यात निवडणुका होणार असून जर खासदार नवनीत कौर राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असता काँग्रेस - राष्ट्रवादी मोठा फटका बसू शकतो.

Updated : 25 Jun 2019 12:29 PM GMT
Next Story
Share it
Top