Home > रिपोर्ट > राज्याच्या विधानसभा , विधानपरिषदेत महिलांची संख्या किती? जाणून घ्या..

राज्याच्या विधानसभा , विधानपरिषदेत महिलांची संख्या किती? जाणून घ्या..

राज्याच्या विधानसभा , विधानपरिषदेत महिलांची संख्या किती? जाणून घ्या..
X

सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे.मात्र तुम्हाला माहित आहेका विधानसभेत आणि विधानपरिषदेत किती महिला आमदार आहेत. विधानसभेत महिलांची संख्या अधिक असून विधानपरिषदेत महिलांची संख्या बोटावर मोजावी इतकीपण नाहीये. विधानसभेत एकूण 21 महिला आमदारांमध्ये 11 महिला भाजपच्या आहेत. त्याखालोखाल काँग्रेसच्या 5, राष्ट्रवादीच्या 3 तर शिवसेना १ तर इतर पक्षाच्या 1 महिला आमदार आहेत.

भाजमधील महिला उमेदवार

1. प्रा. देवयानी फरांदे, नाशिक मध्य

2. सीमा हिरे, नाशिक पश्चिम

3. स्नेहलता कोल्हे, कोपरगाव

4. मोनिका राजळे, पाथर्डी

5. विद्या ठाकूर, गोरेगाव

6. मनिषा चौधरी, दहिसर

7. मेधा कुलकर्णी, कोथरूड

8. पंकजा मुंडे, परळी

9. संगीता ठोंबरे, केज

10. मंदा म्हात्रे, बेलापूर

11. माधुरी मिसाळ, पर्वती

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिला उमेदवार

1. दिपीका चव्हाण, सटाणा

2. ज्योती कलानी, उल्हासनगर

3. संध्या कुपेकर, चंदगड

सुमन रावसाहेब पाटील, तासगाव-कवटेमहंकाळ

काँग्रेसमधील महिला उमेदवार

1. अमिता चव्हाण, भोकर

2. निर्मला गावीत, इगतपुरी

3. प्रणिती शिंदे, सोलापूर मध्य

4. वर्षा गायकवाड, धारावी

5. यशोमती ठाकूर, तिवसा

शिवसेना

तृप्ती सावंत, वांद्रे (पूर्व) ह्या झाल्या विधानसभेच्या महिला आमदार.. आता पाहुयात विधानपरिषदेतील महिला आमदार

काँग्रेसचे : हुस्नाबानू खलिफे (रत्नागिरी).

राष्ट्रवादी- काँग्रेस : विद्या चव्हाण

शिवसेना- नीलम गोऱ्हे

शिवसेना - मनिषा कायंदेफक्त ४ महिला आमदार महाराष्ट्रच्या विधानपरिषदेत आहेत.

एकीकडे आपण म्हणतो महिलांना राजकारणात समान संधी दिली पाहिजे. मोठ्याप्रमाणात महिलांचा राजकारणातील सहभाग वाढला पाहिजे मात्र ३३ टक्के आरक्षण जो पर्यंत मिळत नाही किंवा जो पर्यंत पक्ष महिलांना संधी देत नाही तो पर्यंत ही आकडेवारी कमीच पाहायला मिळेल.

विधानसभेतील आमदार कसे निवडून येतात?

विधानसभेतील आमदारांची निवड ही थेट जनतेतून (विधानसभा निवडणुकातून) होत असते.

तर विधानपरिषदेतील आमदारांची निवड ही राज्यपाल नामनियुक्त स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षक मतदारसंघ किंवा पक्षातील लोकप्रतिनिधींकडून केली जाते.

https://youtu.be/RK7mZbCxSVw

Updated : 22 Jun 2019 6:52 AM GMT
Next Story
Share it
Top