Home > रिपोर्ट > पुरुषांना हेही आवडतं बरं

पुरुषांना हेही आवडतं बरं

पुरुषांना हेही आवडतं बरं
X

लहान मुलांचा साभंळ काही अपवाद वगळता महिला करतांना दिसतात. पालकत्व यावर महिलांचीच मक्तेदारी असल्याच रंगवल जात. वडिल हा मात्र रागीट रागवणारा असा दाखवला जातो, मात्र अनेक पुरुष हे हळवे असतात आपल्या कुटुंबा समवेत त्याबरोबर मुलांसोबत त्यांना वेळ घालवायचा असतो मस्ती दंगा करायचा असतो. घरापासुन दुर असतील तर मुलांची त्यांनाही आठवण येतेच. याच संर्दभात नुकतीच अभिनेता स्वप्नील जोशी यांनी आपली एक पोस्ट शेयर केली आहे त्यात आपल्या मुलां सोबतचा व्हिडीओ टाकुन ते सांगतात की मुलां बरोबरचे हे असे क्षण त्यांना सुखावणारे आहेत. या व्हिडीओ त्यांची मुल त्यांना घरी येताच प्रेमाने मिठी मारतांना दिसत आहेत.

https://youtu.be/2AMOKsKkO2g

तर दुसरीकडे राजकीय आखाडाच गेली महिनाभर महाराष्ट्रात रंगत असतांना या सगळ्या गडबडीत आपल्या मुलांना आनंद देण्यासाठी म्हणुन आमदार रोहित पवार हे खेळण्याच्या दुकानत जावुन खरेदी केल्याची पोस्ट त्यांनी टाकली आहे त्यात ते सांगतात की गेल्या अनेक दिवसापासुन मुलांपासुन दुर असल्याना आता मुलांची भेट होईल तेव्हा हि खरेदी मुलांना नक्कीच सुखावुन जाईल. यावरुन आपल्या लक्षात येते की कामात व्यस्त असलेल्या पुरुषात एक हळवा बापही दडलेला असतो, ज्याला आपल्या मुलांबरोबर वेळ घालवण, त्यांच्या बरोबर मस्ती करण हेही आवडतच.

Updated : 6 Dec 2019 11:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top