Home > रिपोर्ट > धडपडणाऱ्या हाताला आमदार प्रणिती शिंदेंची साथ

धडपडणाऱ्या हाताला आमदार प्रणिती शिंदेंची साथ

धडपडणाऱ्या हाताला आमदार प्रणिती शिंदेंची साथ
X

अत्यंत मेहनतीने व प्रामाणिकपणे लक्ष देऊन शून्यातून स्वतःचे उदयोग- व्यवसाय उभारलेले अनेक उदाहरण आपण बघतो. आज 'एक यशस्वी उदयोजक ' म्हणून नव्याने उदयोग- व्यवसायामध्ये उतरणारे तरुण अनेक आहेत. असंच एका महिलेला पूर्व भाग दत्त नगर येथील मीनाक्षी गंगुंडी या जिद्दी महिलेला व्यवसाया असलेला रस अखेर आमदार प्रणिती शिंदेंच्या मदतीने पूर्ण झाली. प्रणिती शिंदे यांनी मीनाक्षी गंगुंडी यांना चारचाकी हातगाडी भेट दिली असून याचे उद्घघाटन त्यांनी स्वतः केले. ही महिला दत्तनगर बालाजी मोबाईल दुकान जवळील आपल्या गरीब परिस्थितीवर मात करून रस्त्याच्या कडेला नाश्त्याचा गाडा टाकून घरगुती चवीचे इडली, वडा, भजी,स्वतः बनवून या भागातील नागरिकांना स्वस्त दरात सेवा देत आहेत. मीनाक्षी गंगुंडी यांच्या परिस्थिकडे पाहून प्रणिती शिंदे यांनी केली मदत ही महिला उद्दोजकांना प्रेरणा देणारे ठरेल यातून त्यांनी रोजगार मिळवला आणि इतरांनाही दिला. लघू उद्योजकांना कालबद्ध व निश्‍चित स्वरूपाचे मार्गदर्शन होऊन यशस्वी होता येते. या क्षेत्राच्या प्रत्येक उद्योग- व्यवसायाचे स्वतःचे असे व्यावसायिक स्वरूप- प्रारुप असते. जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर खेचून आणलेल्या या यशातून मीनाक्षी गंगुंडी महिलांसाठी नक्कीच आदर्श निर्माण केला आहे.

Updated : 18 Jan 2020 3:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top