Home > रिपोर्ट > दारूमुक्तीतीसाठी "दामिनी दारूबंदी" पथकाची जनजागृती

दारूमुक्तीतीसाठी "दामिनी दारूबंदी" पथकाची जनजागृती

दारूमुक्तीतीसाठी दामिनी दारूबंदी  पथकाची जनजागृती
X

जायभयवाडी या गावामध्ये दारूबंदीसाठी दामिनी दारूबंदी या पथकाची स्थापना करण्यात आली असून या अभियानातर्फे गावामध्ये जनजागृती केली जाते. दरम्यान महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान जायभयवाडी व जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय बीड यांच्या सहकार्याने गावोगावी हे अभियान चालवलं जातं.

अश्या गावांमध्ये सत्यभामा सौंदरमल यांनी दामिनी दारूबंदी पथकाची स्थापना करण्यात आली. दरम्यान यावेळी गावातील महिलांना व पुरुषांना दारू व्यसनाचे होणारे तोटे आणि दारूमुळे उध्वस्त होणारे कुटुंब याबद्दल मार्गदर्शन केले. घरातील कर्त्या व्यक्तीने दारू प्यायल्याने कुटुंबातील महिलांना होणारा त्रास व यामुळे बीड जिल्ह्यातील किती कुटुंबे उध्वस्त झाली आहेत याचं सविस्तर मार्गदर्शन संस्थेच्या प्रमुख सत्यभामा सौंदरमल यांनी केले. यावेळी गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Updated : 11 May 2019 10:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top