Home > रिपोर्ट > तिच्या या कृतीबद्दल आपल्याही डोळ्यात पाणी येईल....

तिच्या या कृतीबद्दल आपल्याही डोळ्यात पाणी येईल....

तिच्या या कृतीबद्दल आपल्याही डोळ्यात पाणी येईल....
X

काल घडलेला एका छोटा प्रसंग , भाच्या साठी काही शालेय साहीत्य आणि कपडे घेण्यासाठी दुकानात गेले , एक कुटुंब कपड्यांच्या त्याच दुकानात आले होतं , ५ माणसांच कुटुंब २ लहान मुली , एक मुलगा आणि आई वडील , मुलीला शाळेसाठी कपडे घ्यायला आले होते . भाषेवरून विदर्भातील वाटले , इथे रोजनदारी वर काम करत असावेत . मुलीसाठी शाळेचा ड्रेस त्यांनी घेतला , पण ओढणी घेतली नाही , पैसे कमी पडत असल्याने आई मुलीला म्हणाली ओढणी जूनी आहे तीच वापर ,मुलगी म्हणाली तीचे धागे निघलेत मला नको ती ...मला ड्रेस च नको , डोळे पटकन भरले तीचे , मला तीला ती ओढणी मिळावी अस मनापासून वाटल पण मी पैसे तीच्या वडीलांना देऊ इच्छित नव्हते , त्यांचा स्वाभिमान दुखवायचा नव्हता मला , मग एक आयडिया सुचली दुकानाच्या मालकीन बाईंना बाजूला घेतल आणि हळूच सांगितलं ती ओढणी त्या मुलीला द्या ,त्याचे पैसे मी देते पण त्यांना ते कळू देऊ नका , ओढणी तुम्ही ड्रेस वर फ्री देताय अस सांगा ...

तीला ओढणी मिळाली , डोळ्यातल पाणी पटकन गायब झाल , आज ती काय दीमाखात शाळेत गेली असेल याचा विचार करुन चेहऱ्यावर smile येतील ,आणि लहानपणी आपण नवीन ड्रेस घालुन शाळेत जायचो , नवीन ड्रेस चा तो वास खूप काही आठवल ...

आपली एक छोटीशी कृती कोणालातरी किती आनंद देऊन जाते आणि कोणाची अडचण ही सुटू शकते .

-सायली धनाबाई ..

Updated : 31 July 2019 12:40 PM GMT
Next Story
Share it
Top