Top
Home > रिपोर्ट > जॉर्जिओस पपानिकोलाऊ: एक शास्त्रज्ञ आणि लाखो स्त्रियांचे जीवन

जॉर्जिओस पपानिकोलाऊ: एक शास्त्रज्ञ आणि लाखो स्त्रियांचे जीवन

जॉर्जिओस पपानिकोलाऊ: एक शास्त्रज्ञ आणि लाखो स्त्रियांचे जीवन
X

20 व्या शतकातील वैज्ञानिक विचारांपैकी आणि एक शास्त्रज्ञ म्हणून जॉर्जिओस पपानिकोलाऊ यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी महिलांसाठी कर्करोग चाचणी विकसित केली . स्त्रियांना होणाऱ्या गर्भाशयाच्या कर्करोगाची एक यशस्वी चाचणी त्यांनी केली. ही चाचणी पप स्मर किंवा पॅप टेस्ट म्हणून आजही ओळखली जाते. त्यांच्या सन्मानार्थ गुगल ने आज 12 देशांमध्ये त्यांचे लोगो आणि सूक्ष्मदर्शीचे डुडल चे चित्रण केले आहे.

जॉर्जिओस पपानिकोलाऊ यांचे जन्म 13 मे 1883 रोजी ग्रीक मधील बेट युबोईया येथे झाले.

पपनिकोलाऊ 15 वर्षांचे असताना त्यांनी वैद्यकीय शाळा सुरू केली.

त्यांनी संगीत आणि मानवतेमध्ये असलेल्या एथेंस विद्यापीठात प्रवेश घेतला.

त्या काळात परंपरेनुसार लोकं व्यवसाय करत असत , त्यांच्या भावांनी कायद्याची निवड केली मात्र पपानिकोलाऊ यांना रुची वेगळी असून ते विज्ञानाकडे झुकले .

१८९८ मध्ये १५ वर्षाचे असताना त्यांनी एथेंसच्या नॅशनल युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये प्रवेश मिळविला आणि तेथून पदवी घेतली.

पुढे त्यांनी लष्करी सैन्यात सहायक सर्जन म्हणून काम केले.

१९०४ मध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली.

ते पुन्हा ग्रीसला परतून त्यांनी आपल्या गावाच्या बाहेरील भागात कुष्ठरोगांची काळजी घेतली.

१९१० साली त्यांनी प्राणीविद्यालयात पीएचडी मिळवली.

ऑक्टोबर १९१४ मध्ये कॉर्नेल विद्यापीठातील संशोधक म्हणून पपनिकोलाऊ यांची नियुक्ती करण्यात आली तिथे ४७ वर्षे त्यांनी काम केले.

त्यांनी महिला पुनरुत्पादन प्रणालीच्या कर्करोगाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली.

पहिल्यांदा पपनिकोला यांनी गर्भाशयाचे कर्करोग असलेल्या एका स्त्री चा नमुना चाचणी करून कर्करोगाच्या पेशीची ओळख पटविली.

Updated : 14 May 2019 7:18 AM GMT
Next Story
Share it
Top