एअर इंडियाच्या पायलटविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप
Max Woman | 15 May 2019 5:40 AM GMT
X
X
एअर इंडियाच्या पायलटने आपल्या सहकारी महिला पायलटचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप कारण्यात आला असून 5 मे रोजी एअर इंडियाच्या पायलटने माझं शोषण केल्याचा आरोप महिला पायलटने लावला या घटनेची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान हैदराबाद येथे प्रशिक्षण शिबिरावेळी ही घटना घडली आहे . हैदराबाद येथे प्रशिक्षण शिबिराला असताना जेव्हा शिबीर संपला असताना आम्ही दोघं जेवणासाठी एका रेस्टॉरंटला गेलो. जेवण झाल्यानंतर त्या पायलटने मला त्याच्या जीवनात होत असलेल्या त्रासाबद्दल सांगितले मात्र त्यांच्या चर्चेवेळी अश्लिल संवाद माझ्यासोबत त्यांनी केले त्यामुळे मी त्यांना नकार देऊन कॅब बोलवून घरी जाण्यासाठी निघाल्याचं महिला पायलटने सांगितले. दरम्यान मी घरी पोहचल्यानंतरही त्या सिनिअर पायलटने मला मोबाईलवर मॅसेज पाठवले. अनेक वेळा त्यांनी भेटण्यास सांगितले असता मी त्यांना नकार दिले मात्र त्यांनी रूममध्ये येण्याची धमकी देखील दिली. या घडलेल्या प्रकाराची महिला पायलटने तक्रार केल्यामुळे हे प्रकरण समोर आलं आहे. दरम्यान एअर इंडियाने या प्रकरणाची चौकशी करणार असून पायलट दोषी आढळल्यास कारवाई करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.
https://twitter.com/ANI/status/1128471028894662656
Updated : 15 May 2019 5:40 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire