Home > Max Woman Blog > चित्रपटांमध्ये तृतीयपंथीयांची 'इमेज मेकिंग' कधी होणार?

चित्रपटांमध्ये तृतीयपंथीयांची 'इमेज मेकिंग' कधी होणार?

‘लक्ष्मी या चित्रपटा सदर्भात तृतीयपंथी बांधवांत दुमत आहे. त्यामुळे खरचं चित्रपटसृष्टी तृतीयपंथीयांची भूमिका दाखवण्यात गफलत करते का? असा प्रश्न पडतो.’ वाचा पत्रकार प्रियंका आव्हाड यांचा लेख..

चित्रपटांमध्ये तृतीयपंथीयांची इमेज मेकिंग कधी होणार?
X

अक्षय कुमारची तृतीयपंथी भूमिका असलेला "लक्ष्मी" हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. खरतर हा सिनेमा कांचना या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. आजवर आपण अनेक सिनेमात तृतीयपंथी किरदार पाहिलेत. या सगळ्या सिनेम्यात तृतीयपंथींची इमेज आपण कॉमेडीच्या स्वरुपात बघितली आहे.

कुंकू, साडी, हातात बांगड्या अगदी सजणं-सवरणं त्यांच अस्तित्व, ओळख आणि संस्कृती दाखवते हे आपण सर्वच जाणतो.

आज या विषयावर लिहिण्याचं कारण असं की, मी सोशल मीडियावर दोन तृतीयपंथीयांचे व्हिडिओ पाहिले. तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी गेल्या अनेक वर्षापासून लढा देत आहे अशा लक्ष्मी नारायण त्रिपाठी... त्यांनी ट्विटरवर लक्ष्मी बॉम्ब या सिनेम्याचं प्रमोशन करणारा एक व्हिडिओ शेअर करत अक्षय कुमारची स्तुती केली आहे. हा सिनेमा खूप सुंदररित्या बनवला गेल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच या सिनेम्याच्या मार्केटिंग टीममध्ये लक्ष्मी यांचा महत्वाचा रोल आहे. अक्षय कुमार आणि कियारा अडवाणीसह अनेक ठिकाणी त्या प्रमोशनसाठी गेल्या होत्या.

तर दुसरीकडे तृतीयपंथी माधुरी सरोदे शर्मा यांनी लक्ष्मी बॉम्ब हा सिनेमा आम्हा किन्नरांची ओळख, संस्कृती, अस्तित्वाची खिल्ली उडवणारा आहे. त्यामुळे आमचा संपूर्ण समाज याचा विरोध करतो असा व्हिडिओ शेअर केला. यावर माधुरी यांच्याशी माझं बोलणं झालं असता त्यांनी सांगितले की प्रत्येक समाज समर्थक आणि विरोधक असतातच असं सांगत आमचा लक्ष्मी गुरूजी यांना विरोध नाही तर या फिल्मला आहे.

एका विषयावर एका समाजातलं दुमत पाहिल्यानंतर खरचं चित्रपटसृष्टी तृतीयपंथीयांची भूमिका दाखवण्यात गफलत करते का? सिनेमातून #Transgenders यांची इमेज मेकिंग कधी होणार? असा प्रश्न आज मनात आला.

प्रियंका आव्हाड,

लेखिका पत्रकार आहेत.

Updated : 9 Nov 2020 5:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top