Home > Max Woman Blog > सुखा पासून आपण दुर जातोय....

सुखा पासून आपण दुर जातोय....

सुख म्हणजे नेमक काय असतं? मनात निर्माण होणाऱ्या तरल भावना, मनात होणारी आनंदाची छटा, की मनात होणारी एक अतिशय सुखद अनुभुती? काय म्हणतात समुपदेशक पुष्पा सूर्यवंशी जाणून घ्या!

सुखा पासून आपण दुर जातोय....
X

सुख म्हणजे नेमक काय असतं? मनात निर्माण होणाऱ्या तरल भावना, मनात होणारी आनंदाची छटा, आणि मनात होणारी एक अतिशय सुखद अनुभुती. याला तर आपण सुख म्हणतो. लहानपणापासून तुम्ही आठवा.. तुम्हाला नक्कीच अशा सुखाचे अनुभव पुन्हा पुन्हा अनुभवायला येतील .तुम्हाला माहित आहे ना! पहिल्या पावसाचा पडलेला मातीचा सुगंध आजही मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपून ठेवलोय आपण. घेतलेले नवीन पुस्तक घरात कुणी आणलं,तर त्या पुस्तकाचा सुगंध काही वेगळाच आपण अनुभवलाय. आपण संकटात सापडलो, आणि कोणी आपल्या डोक्यावरून हळुवारपणे, मायेचा, ममतेचा हात फिरवला तर ही पर्वता एवढी संकटे ,भूर पळून जाता.तो प्रेमाचा ओलावा आजही आठवते. मग आपण आज या आनंदापासून दूर का जात आहोत? आजच्या या धकाधकीच्या युगात आणि ताणतणावाच्या युगात तर आपण अधिकाधिक सुखापासून वंचित होत चाललोय .त्याला आपण जबाबदार नाही का? बऱ्याच गोष्टी आपल्या हातात असतात ते आपण करत नाहीत. आपल्या मुलाबाळांना तू सुखद अनुभव कसा घ्यावा हे आपण शिकवत नाहीत. किंवा ती अनुभूती त्यांना घेण्यासाठी भाग पाडत नाही.आज पाऊस पडत नाही का? मातीचा सुगंध येत नाही का ?नवीन पुस्तक बाजारात येत नाहीत का? किंवा अडचणीत आपण कुणाच्या डोक्यावरून हात फिरत नाही का? हे आजही आहेच. पण आपणच या तांत्रीक युगात एवढे गुरफटून पडलो की पहिल्या पावसापासून घ्यावयाचा आनंद गमावून बसलो..त्यापेक्षा टीव्हीवर मोबाईलवर किंवा अन्य बाबीवर आपला बराच वेळ घालवतो याचा परिणाम आपल्या मुलाबाळावर होतोय.

पुस्तक वाचणे ही तर हरवत चाललेली एक अतिशय वाईट बाब आहे. कारण पुस्तक माणसाचं मस्तक घडवतं आणि वाचून तयार झालेल मस्तक कोणाचा हस्तक होत नाही. ही जाणीव आपल्याला जरी असली तरी मुलाबाळांना नाही .वाचण्याची गोडी वाढवण्यासाठी हा छंद जोपासण्यासाठी किंवा वाढण्यासाठी आपण स्वतः वाचलं पाहिजे. दररोज किमान अर्धा ,एक तास तरी वाचण्यासाठी वेळ दिला पाहिजे. सुरुवातीला मुलांना जी पुस्तक आवडीची वाटतात ती जरूर वाचू द्या. नंतर हळूहळू त्यांची जशी प्रगल्भता वाढते आणि त्यांना पुस्तकातील महत्त्व कळायला लागतं तसं तसं त्यांना उपयोगाची, महत्त्वाची असलेली, जगात अतिशय उपयुक्त असलेली पुस्तके ती वाचायला सुरुवात करतील.असं म्हटलं जातं ज्यांच्या घरांमध्ये पुस्तकांच्या कपाटा पेक्षा टीव्ही मोठा असतो तेथे ते घर विचाराने कमकुवत आणि संकुचित झालेला असतो. आपण या सुखा पासून दूर होण्यासाठी स्वतः जबाबदार नाही का? आजही अडचणी येतात, संकटे येतात डोक्यावर मायेने, ममतेने हात फिरताना मायेचा ओलावा वेगळा कसा असतो हे आपल्या पिढीला शिकवायला आपण नको का?

काळ बदलत आलेला आहे, परिस्थिती बदलली आहे आपल्याला किंवा आजच्या पिढीला हे सर्व स्वार्थी ,मतलबी ,ढोंगीपणा वाटू शकेल कदाचित.हा काळाचा महिमा आहे. त्याला आपण रोखू शकत नाही पण तुम्ही खरंच मनापासून एखाद्यावर जीव लावला, मनापासून प्रेम केलं आणि मग संकटं काळात मायेच्या उब साठी जवळ गेला, पाठीवरून हात फिरवला तो सुखाची अनुभूती घेणार नाही का? काही काळ लागेल पण त्याची खरी प्रेमाची भूक नक्कीच यातून भागेल. आपण सर्वांनी मिळून या नवीन पिढीला या सुखा पर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे. आता सुट्ट्या लागत आहेत. शाळेमध्ये मुलं घरी येतात. अशा मुलांना आपण ज्या वेगळ्या सुखाच्या अनुभूती आहे त्या अनुभूती शिकण्यासाठी अनुभूती घेण्यासाठी स्वतः प्रयत्न करायला काय हरकत आहे. तर पुन्हा हा सुख अनुभव आपल्याला नक्कीच घेऊ शकतो .नाहीतर भीती वाटत जाते आपण या सुखा पासून कायमचं दुर होणार तर नाही...


Updated : 24 April 2024 5:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top