Home > Max Woman Blog > महिलेला जटा-मुक्त करून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन!

महिलेला जटा-मुक्त करून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन!

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त जगभरात अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी मात्र एका महिलेची जट कापून बाबासाहेबांना कृतिशील अभिवादन केले आहे.

महिलेला जटा-मुक्त करून  बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन!
X

काल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 64 वा महापरिनिर्वाण दिन जगभर साजरा झाला. लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे त्यांना अभिवादन केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी एका महिलेची जट कापून बाबासाहेबाना कृतिशील अभिवादन केले आहे. पुणे शहरातील मंगळवार पेठेत राहणाऱ्या ज्योती कांबळे(वय55) यांच्या डोक्यात गेल्या 17 वर्षापासून जट झाली होती. त्यांना याचा त्रास व्हायचा. कधी वेगळी वागणूक मिळायची. पण त्यांच्या गुरूंनी मनात भीती निर्माण केल्याने त्या जटा काढण्यास तयार होत नव्हत्या.



नंदिनी जाधव गेल्या तीन वर्षांपासून जटा काढण्यासंदर्भात त्यांचे समुपदेशन करत होत्या. सतत तीन वर्षाच्या समुपदेशनाचे हळू-हळू त्यांच्या मनातील भीती कमी झाली. आणि या महापरिनिर्वाण दिनी ही जटा काढण्याची विनंती केली.




त्या जटा काढण्यास तयार झाल्या. आणि नंदिनी जाधव आणि सहकाऱ्यांनी त्यांची जटा कापून टाकली. नंदिनी जाधव यांनी याआधी 186 महिलांचे जटानिर्मुलन केले आहे. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना केलेल्या अशा प्रकारच्या अभिवादनाने नवा कृतिशील पायंडा निर्माण झाला आहे.






Updated : 7 Dec 2020 10:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top