- एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री..
- कॉन्डोम कंपनीच्या आलीया व रणबीरला अनोख्या शुभेच्छा..
- म्हणून एकाच कुटुंबातील 9 जणांनी केली हत्या, अखेर गूढ उलगडलं..
- #MaharashtraPoliticalCrisis ; एकनाथ शिंदे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात काय घडतंय?
- "मॅडम मी खूप टेन्शन मध्ये आहे, आमचा आमदार गुवाहाटीला आहे.." Audio Clip Viral
- आता या सहा मुली ही जाणार गुवाहाटीला..
- आदित्य ठाकरेंची थेट धमकी, आत एकनाथ शिंदेंचे काय होणार?
- Teesta Setalvad ; गुजरात दंगलीप्रकरणी तीस्ता सेटलवाड यांना गुजरात ATS घेतले ताब्यात..
- बंडखोर शिंदे गटाचे नाव ठरले 'शिवसेना...'
- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या आरोग्यवारी अभियानाची सुरुवात

Covid19 : मुलांचीही मानसिक तयारी करा…
X
कोणत्याही अटीतटीच्या काळामध्ये, प्रसंगामध्ये एरवी जिगरबाज वाटणारी माणसं गळपटून जातात. मागील काही दिवस आम्ही घरात करोनाबद्दल बोलतो तेव्हा एक उल्लेख जरुर करतो, आम्हाला करोना झाला तर.. मुलगा ते ऐकत असतो, त्यालाही प्रश्न विचारतो.. आजाराचा मुकाबला करण्यासाठी आपल्याला एकेकट्याने रुग्णालयात जायचं. तिथे आपला सगळा भार हा त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांवर, परिचारिकेवर. इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर..
श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला तर डोंबल आपण कसं काय सांगणार. असलेलं सगळं ज्ञान काय कामाचं. अशाही शंका मनात येतात. लॉकडाऊनच्या काळामध्ये मुलांशी असलेलं नात, सवय अधिक गडदघट्ट झालीय. त्यामुळे असं संकट समोर आलं तर त्याला डिल करण्याचं ऑप्शन मॅनेजमेंट कसं असायला हवं याबद्दल मुलांकडे बोलायला हवं. ( हे बोलणं घाबरवणं नाहीए)
मुलांच्या वाढीच्या टप्प्यात अशा प्रकारचे प्रसंग आयुष्यात आले तर त्याला तोंड द्यावं लागेल या मानसिक तयारीचाही हा भाग वाटतो.
करोनाने टिळा लावलाच तर स्वतः पॅनिक न होता, दुसऱ्यांना पॅनिक न करता ही परिस्थिती संयमाने हाताळण्यासाठी ही मानसिक तयारी करायला हवी.
घरातल्या चर्चेत दोघांना करोना झाला, एकालाच झाला, मुलाला एकट्याला राहावे लागले, कुणाकडे ठेवावं लागलं तर काय करायचं, घरातच आयसोलेट व्हावं लागलं तर कोणती काळजी घ्यायची..एकमेकांना मदत कशी करायची..अशा सगळ्या प्रश्नांचा समावेश असतो..
पहिल्यांदा या शक्यता वर्तवल्या तेव्हा आत्मजने त्या उडवून लावल्या. अस्सं काही होणार नाही. असं त्रोटक म्हणाला तो.
नाही होणार आपण काळजी घेतोय पण झालं तर काय..मी प्रश्न बदलला नाही.
दोनेक दिवसांनी असं होऊ शकतं या शक्यतेच्या तो जवळ आला, भिती थोडी कमी झाली, बरे होऊन येणाऱ्यांच्या बातम्या मुद्दाम वाचून दाखवल्या. काळजी कशी घ्यायची. अशी वेळ आली तर ती निभावण्यासाठी हिंमत कशी बांधायची..असे बरेचसे साधेसोपे प्रश्न यात असतात.
कुणाला हे वाईट वंगाळ बोलण वाटतं. मला ते वाटत नाही. लहानपणी मोठा भाऊ वाडियात आणि अपघातामुळे वडिल केईएममध्ये. मी ओळख नसलेल्या काकीकडे महिना दिड महिना राहिले होते..तो आधार मोलाचा होता..पण माझ्या चिमुकल्या मनात आईची भेट न झाल्यामुळे उमटलेले प्रश्न कित्येक वर्ष तसेच राहिले...खूप वर्षांनी मी ते आईला सांगितले...
पटकन मदत मागावी लागली तर ते तुझ्या फोनचे लॉक काढून ठेव, या सुचनेचा जोर लेकाकडून वाढता आहे. नवे किती गेम डाऊनलोड होतील याची खात्री नसल्यामुळे अजून मी टाळ्याचं कुलूप उघडलं नाहीय.
- शर्मिला कलगुटकर
लेखीका पत्रकार आहेत...