Home > Max Woman Blog > उद्धव ठाकरेंना शिवीगाळ, राजकारण कोणत्या स्तराला चाललंय?

उद्धव ठाकरेंना शिवीगाळ, राजकारण कोणत्या स्तराला चाललंय?

उद्धव ठाकरेंना शिवीगाळ, राजकारण कोणत्या स्तराला चाललंय?
X

राज्याचे राजकारण कोणत्या स्तराला चाललंय? महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक राजकीय घटना घडल्या पण सध्या जे राजकारणात घडतंय ते याआधी कधीही इतिहासात घडलं नव्हतं. राजकीय नेत्यांपासून त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत आपण जर पाहिलं तर त्यांचं वर्तन दिवसेंदिवस ढासळत चालले आहे. इतिहासात अनेक उदाहरणे आहेत ज्यामध्ये राजकारणामध्ये कट्टर वैरत्व असलेले अनेक राजकारणी ज्यावेळी भेटत होते त्यावेळी संपूर्ण वैरत्व ते बाजूला ठेवत. राजकीय वैर एका बाजूला आणि समाजकारणात वावरत असताना, काम करत असताना त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असतं अशी फक्त राजकीय नेत्यांचीच नाही तर त्यांच्या कार्यकर्त्यांची सुद्धा पद्धत होती. पण आजचे नेते आणि कार्यकर्ते महाराष्ट्राची ही सुसंस्कृत परंपरा, इतिहास धुळीस मिळवत आहेत की काय? असा प्रश्न आहे. हे आपण इतकं सारं बोलतोय याचं कारण एक व्हिडिओ आहे. समाज माध्यमांवर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये बहुदा आंदोलक आंदोलन करत आहेत आणि यावेळी ते राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अत्यंत अश्लील भाषेत घोषणा देत आहेत. या व्हिडिओची सत्यता आम्ही पडताळून पाहिलेली नाही, मात्र समाजमाध्यमांवर असे व्हिडिओ व्हायरल होणे फार भयंकर आहे.

खर तर एखाद्या नेत्याची आई बहीण काढणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? राज्याचे राजकारण कोणत्या स्तराला जाऊन पोहोचले आहे याचा आता विचार करण्याची गरज आहे. आजपर्यंतचा इतिहास जर पाहिला तर आपल्याला माहित आहे, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे कट्टर विरोधक. बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यावर अनेक वेळा टीका केली. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारा वेगवेगळ्या होत्या पण राजकारणापलीकडे जाऊन त्यांची मैत्री देखील वेगळी होती. याबाबतचे अनेक प्रसंग ही सांगता येतील, बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार यांना अनेक वेळा वेगवेगळ्या विशेषणांनी संबोधित केलं होतं. बाळासाहेब बऱ्याचदा सभांमध्ये शरद पवारांना शरदबाबू अशी सुद्धा हाक मारायचे तर ज्यावेळी राजकीय विरोध करायचे त्यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीका करताना मैद्याचं पोतं अशीही टीका केली होती. इतके कट्टर विरोधक असून या दोघांमधील मैत्रीची आजवर चर्चा होते. महाराष्ट्राच्या इतिहासातील अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील.

पण सध्या हे राजकारण अत्यंत वेगळ्या टोकाला जाऊन पोचले आहे. राजकीय द्वेषातून कुठल्या नेत्याची आई-बहीण काढल्याचं याआधी किंबहुना कधीच घडलं नसेल. सध्या समाज माध्यमांवर उद्धव ठाकरेंना शिवीगाळ करणारा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. एकीकडे हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतं असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी सुद्धा एक ट्विट केले आहे. या ट्विट मध्ये त्यांनी म्हंटले आहे की, "तुह्या मायला उदव ठाकरे XX, तुह्या मायला अजित पवार XX, तुह्या मायला दांडेगावकर XX, तुह्या मायला मुंदडा XX, तुह्या मायला राजु नवघरे XX.... शी इतकी गलिच्छ भाषा असावी का एका संवेदनिक पदावर असलेल्या लोकप्रतिनिधीची? असं ट्विट करत त्यांनी याबाबतचे रेकॉर्डिंग टाकणार असल्याचं म्हटलं आहे.


राज्याचे अनेक प्रश्न आहेत. आज शेतकरी अवकाळी पावसामुळे मेटाकुटीला आले आहेत, लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत, विद्यार्थ्यांना नोकरीचा प्रश्न आहे, बेरोजगारीने अनेक तरुण युवक बेचैन झाले आहेत, देशात व राज्यात महागाईचा भस्मासुर झाला आहे, महिलांचे अनेक प्रश्न आहेत. राजकीय मंडळींनी या प्रश्नांवर चर्चा करणे अपेक्षित आहे पण सध्या राज्याच्या राजकारणात अशा प्रकारच्या गोष्टी सुरू आहेत. त्यामुळे आता या राजकीय लोकांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना थाऱ्यावर आणण्यासाठी जनतेने ठाम भूमिका घेतली पाहिजे. लोकप्रतिनिधींनी तुमचे-आमचे प्रश्न मार्गी लावणे अपेक्षित असतं. सत्तेचा किंवा पदाचा कोणी गैरवापर करत असेल तर जनतेने जाब विचारला पाहिजे. जनता हुशार झाली नाही , जनता जागृक झाली नाही तर महाराष्ट्राचा सुसंस्कृत इतिहास एक दिवस नक्कीच धुळीत मिळेल.

Updated : 18 March 2023 10:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top