- एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री..
- कॉन्डोम कंपनीच्या आलीया व रणबीरला अनोख्या शुभेच्छा..
- म्हणून एकाच कुटुंबातील 9 जणांनी केली हत्या, अखेर गूढ उलगडलं..
- #MaharashtraPoliticalCrisis ; एकनाथ शिंदे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात काय घडतंय?
- "मॅडम मी खूप टेन्शन मध्ये आहे, आमचा आमदार गुवाहाटीला आहे.." Audio Clip Viral
- आता या सहा मुली ही जाणार गुवाहाटीला..
- आदित्य ठाकरेंची थेट धमकी, आत एकनाथ शिंदेंचे काय होणार?
- Teesta Setalvad ; गुजरात दंगलीप्रकरणी तीस्ता सेटलवाड यांना गुजरात ATS घेतले ताब्यात..
- बंडखोर शिंदे गटाचे नाव ठरले 'शिवसेना...'
- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या आरोग्यवारी अभियानाची सुरुवात

राजकारणात नवं क्षितिज दाखवणारी तरूणी संध्या सोनावणे
महिला दिनाच्या औचित्याने कुलदिप आंबेकर यांनी राष्ट्रवादीची धडाडीची तरूण महिला राजकारणी संध्या सोनावणे यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख लिहिला आहे.
X
काळ झपाट्याने बदलतोय, काळानुरुप महिला व युवतींचे आता सबलीकरण व सक्षमीकरण होत आहे. नवनवे क्षेत्र त्या स्वतःच्या कर्तबगारीवर काबीज करत आहेत. त्यांच्या हक्क व अधिकारांबद्दल त्या प्रचंड जागृत झाल्या आहेत. विशेषतः कोणत्याही प्रकारची मदत न घेता त्या हिंमतीने संघर्ष करतात, लढतात आणि यशस्वीदेखील होतायत. पुर्वीचे व आताचे प्रश्न, अडचणी, अपेक्षा जरी वेगवेगळ्या असतील तरी त्या बदलत आहेत आणि हळुहळु परीवर्तनही करत आहेत.
सध्या जगभरात सर्वच क्षेत्रात अंत्यत महत्वाच्या पदावर महिला विराजमान आहेत. त्यांच्या भुमिकेने त्या ज्या क्षेत्रात काम करतात त्यामध्ये त्या नवी कात टाकत आहे. जुन्या रुंढींना थारा देत नाहीत. त्या नव्या बदलांची नांदी ठरत आहेत. ही खरंच कौतुस्कापद बाब आहे.
यात राजकारण व त्यातील महिला आणि युवती या विषयाकडे जर बारकाईने आपण पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येईल की निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असो किंवा विधानसभा, लोकसभेच्या असो, यामध्ये पारंपरिक राजकारणातील मंडळींचा व त्यांच्याच महीला नातेवाईकांचा आजही वरचष्मा आहे. त्यांनाच प्राधान्य दिलं जातं हे वास्तव आहे.
याला काही मुठभर महिला अपवाद असतीलही.पण ती संख्या नगण्यच.... स्थानिक स्वराज्य कायद्यातुन सर्व महिलांचं कल्याण झालं हे अगदी खरंय. पण सर्वसामान्य युवती व महीला यांच्याकडे क्षमता असुनही त्या संधी अभावी दूर आहेत. आजही महिला या निवडणुक प्रक्रीयेत म्हणावं त्या प्रकारे सहभाग घेत नाहीत किंवा त्यातलं काही त्यांना कळत नाही असा काहीचा गोड गैरसमज असतो. तो साफ चुकीचा आहे. अशा अनेक कारणांनी त्यांना दूर ठेवलं जातं.
आज पण राज्यकर्ते सर्वसामान्य महिलांना व युवतींना संधी देण्याबाबत उदासिन असतात. कारण त्यांची अर्थिकक्षमता, त्यांची पारंपारिक मते, त्यांच्या कुटूंबाचं योगदान पाहीलं जाते. त्या वरचढ ठरु नये यासाठी ते नामधारीच महिला पाहतात. यासाठी ते प्रयत्नशील असतात. अभ्यासु युवती व महिला निवडणुकीस उभी केली तर त्याच्यासाठी ते भविष्यात अवघड गणित ठरू शकते. ठरलेल्या व्यवस्थेशी बोलणार्याड, भिडणार्यात आणि संघर्ष करणार्याल महिला त्यांना नको आहेत.
अशावेळी राज्यातील काही युवती आपल्या कार्यकतृत्वांनी राजकारणात व समाजकारणात वेगळा ठसा उमटवतात. ही प्रेरणादायी गोष्ट आहे. यामध्ये प्रामुख्याने संध्या सोनवणे हे नाव आवर्जून घ्यावं लागेल. ही उच्चशिक्षित विद्यार्थिनी गेल्या काही वर्षात पुण्यात राहुन युवतींच्या शैक्षणिक, आरोग्य व सुरक्षा या प्रश्नांवर काम करतेय. आवाज उठवतेय, त्यांना न्याय देतेय.
संध्याने आयुष्यातील काही उमेदीची वर्ष या शहरात राहुन प्रामाणिक काम केलं आहे. आताही ती मोठया जिद्दीने व कष्टाने महत्वाकांक्षी व्हीजन डोळयासमोर ठेऊन काम करतेय. त्यासाठी नियोजनबद्ध धोरणही तिने आखले. हे शिवधनुष्य पेलवणे कठीण असते पण मोठया नेटाने ती ते पेलवतेय. कारण ती कणखर व सक्षम आहे.छोट्या नायगाव गावातुन ता.जामखेड जि.अमहदनगर येथुन आलेली ही तरूणी अनेक संघर्षातुन पुढे आलेली आहे. सध्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची विभागीय अध्यक्ष ,ग्रामपंचायत सदस्य म्हणुन ती कार्यरत आहे.
समाजातील वंचित घटकांसाठी ती काम करतेय. विशेषतः ग्रामीण भागातील अल्पवयीन विद्यार्थिनींच्या शैक्षणिक, आरोग्य व सुरक्षाविषयक प्रश्नांवर प्रत्यक्ष रचनात्मक काम करतेय. त्यासाठी तिने येणार्यान काळात दुरदृष्टी ठेऊन नियोजन केलंय. गरीब विद्यार्थिनींचे अपुरं शिक्षण व अस्वास्थ्यामुळे कसे अतोनात हाल होतात हे तिने अनुभवलंय.
काही विद्यार्थिनींचे कोरोनानंतर शिक्षण थांबले. घरच्या जबाबदार्याि त्यांच्यावर आल्यावर क्षमता असुनही करीअर करता आले नाही. काही मुली शैक्षणिक प्रवाहाच्या बाहेर आहेत. आरोग्याकडे त्या दुर्लक्ष करत आहेत. अशा असंख्य प्रश्नांना संध्या सध्या हात घालतेय. अशा युवतींमध्ये रुळतेय, स्थानिक प्रश्नांना वाचा फोडतेय. स्थानिक स्वराज्य निवडणुकांत होणार्या पारंपारिक राजकारणाला छेद देतेय. तसेच दुर्लक्षित राहिलेल्या महिला, युवती, विद्यार्थिनी यांना आत्मविश्वास निर्माण करतेय. त्यांना समाजातील सत्य परिस्थीतीची जाणीव करुन देतेय. कायद्याची माहीती देउन त्यांना जगण्याचा नवा मार्ग देतेय.
खरं पाहता जमिनीशी नाळ जोडुन काम करणारी मंडळी खूप कमी आहेत. त्यात तरुण मंडळी तर अत्यंत अल्प असतात. पण संध्या नावाची ही युवती चिकाटीने हार न मानता या सर्व प्रश्नांशी दोन हात करत लढतेय. असे एक ना अनेक प्रश्न घेऊन सर्व तळागाळातील विद्यार्थीनीचा अशेचा किरण बनत चाललीय. तिच्या या कल्पक व दूरदृष्टी नेतृत्वास सलाम..
शब्दांकन
कुलदीप आंबेकर