Home > Max Woman Blog > सोहम, बबड्या आणि सत्यपरिस्थिती! 

सोहम, बबड्या आणि सत्यपरिस्थिती! 

सोहम, बबड्या आणि सत्यपरिस्थिती! 
X

सध्या झी मराठीवरील 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतील सोहम पात्र तुफान गाजतयं. गाजतयं म्हणण्यापेक्षा ट्रोल होतयं म्हणुया. याचं मुख्य कारण म्हणजे बबड्याचा लाडावलेला स्वभाव. आत्ता अर्थात सोहम हा त्या मालिकेत व्हिलनची भुमिका साकारत असल्याने तो वेगवेगळे कृत्य करणार हे नक्की आहे, पण हे सर्व कृत्य आपण खऱ्या आयुष्यात कधी ना कधी पाहतो किंवा अनुभवतो.

हा सोहम आपल्याला समाजाच्या विविध भागांमध्ये पहायला मिळतो. कधी तो तुमचा मुलगा असेल तर कधी तो तुमचा नवरा ही असू शकतो.

या सर्व प्रकरणाची मुळ सुरवात होते कुठून?

आधीपासूनच वंशाचा दिवा ही संकल्पना अनेक जण जपत आले आहे. तर या सर्व प्रकरणात मुलींना अर्थातच घरची काम करणं लहापणापासून शिकवली जातात, तर दुसरीकडे मुलांना सगळ्या गोष्टीची सवय लावली जाते. जेवणाच्या ताटापासून ते आंघोळीच्या टॉवलेपर्यंत अनेक लहान गोष्टी हातात दिल्या जातात. आईने साधं भाजीत मीठ कमी घातलं तरी आई सोबत भांडणारी मुले आपण पाहतो. पण याचा खरा परिणाम लग्नानंतर दिसून येतो. हल्लीच्या घाई-गडबडीच्या जगात नवरा-बायको हे दोघेही नोकरी करत असतात. नवरा बायको यांचा वेळ मॅनेज न झाल्याने बायकोला नोकरी आणि घर दोन्ही सांभाळता-सांभळता घाम फुटतो. तरी या मुलांमधील 'बबड्या'चा गुणधर्म काही नष्ट होत नाही. अनेकदा खटके उडायला सुरवात होते. नवऱ्याला अगदी सर्व गोष्टींची सवय झालेली असते. यात आपल्याला अनेकदा अपवाद पहायला मिळतात.

असो, सांगायचं तात्पर्य एवढचं की कधी ऑफिसमधून घरी लवकर गेलात तर आईला किंवा बायकोला जेवणासाठी मदत करा, कधी तरी एकदा सकाळी स्वतःचा डब्बा स्वतः बनवा. खरचं अनेक गोष्टी बदतील आणि नाती जपली जातील.

आणि हो एकंदरीत काय तर खऱ्या आय़ुष्यातील बबड्या अगदी स्पष्टपणे मालिकेच्या रुपातून मांडला गेलाय. सोहमच्या स्वभावाचा मेल इगोला धक्का पोहचण्याआधी दुसऱ्या बाजूने विचार करा.

Updated : 18 March 2020 12:27 PM GMT
Next Story
Share it
Top