Home > Max Woman Blog > नजरेला/मेंदूला झापडं लागली नसतील तर... वाचा कविता सुनंदा यांचा झुंडमय ब्लॉग!

नजरेला/मेंदूला झापडं लागली नसतील तर... वाचा कविता सुनंदा यांचा झुंडमय ब्लॉग!

झुंड सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून दिग्दर्शक नागराज मंजूळेचं चहूबाजूंनी कौतूक केलं जातंय. नागराज ने ज्या पध्दतीने सार्वभौम भारतातील दोन वर्गांमधला भेद समोर मांडला आहे यावरच आणखी जाणून घेण्यासाठी वाचा कविता सुनंदा यांचा लेख!

नजरेला/मेंदूला झापडं लागली नसतील तर... वाचा कविता सुनंदा यांचा झुंडमय ब्लॉग!
X

सैराट नंतर मराठी चित्रपटसृष्टीने रिंकू राजगुरूचं करू घातलेलं आर्चीकरण झुंड चित्रपटाने निकालात काढलं आणि हे अतिशय गरजेचं व महत्वाचं होतं. झुंड मधल्या मोनिका गेडामचा "ओळखीच्या राजकारणाचा" प्रवास बघणाऱ्या व्यक्तीच्या कायम लक्षात राहिल अशी दृश्य योजना नागराज मंजुळेनं केली आहे हे एक. दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे CAA+NRC आणि Dijital India चा भ्रम इतक्या कमी वेळात इतका रोखठोक, प्रखरपणे व नेमका दाखवता येतो हे खरंच इतर नव्या दिग्दर्शक होऊ पाहणाऱ्यांनी शिकण्यासारखं आहे. आपल्या नजरेला/मेंदूला झापडं लागली नसतील तर आपली कलाही रोजच्या जगण्यातले संदर्भ सहजपणे पॉलिटीकल स्टैटमेंट्स करतेच. त्यासाठी भयंकर स्टंट करण्याची गरज पडत नाही.

"पर मैने तो तुमको पैचानना चाहिए की नहीं?" ही पोलिस पाटलाची व्हाटाबाऊटरी किती हिंसक आहे नि ह्या व्हाटाबाऊटरीने हसणाऱ्या प्रेक्षकवर्गाच्या हे लक्षात येतं की नाही की "हा जोक मोनिकाच्या बापावर नसून आपल्यावरच म्हणजे 'we the people'वर असतो." मल्टीप्लेक्समधले हे प्रेक्षक तिच्या न भाषांतरीत केलेल्या भाषेवरही हसतात तेंव्हा एकूणच आपला विविधतेतल्या उथळ एकतेच्या शपथेचा सातबारा दिसतो. "सारे भारतीय माझे बांधव आहेत." ही शपथ सक्सेसफुली दहावीपर्यंत रोज घेणारे आपण आणि दोन दिवस शाळेत गेलेली मोनिका हा भेद/फरक व माझा रोख आपल्याकडे आहे हे स्पष्ट व्हायला हरकत नाही.


बरोबरच मोनिकाचा हा ओळख मिळवण्याचा प्रवास जिथे सक्सेसफुल होतो त्याचक्षणी कॅमेरा भावना ह्या उच्चवर्णीय पात्रावर सरकतो. तिचं काय चाललेलं असतं हे आपण पाहतोच. दोन दिवसांपूर्वी मी मंजुळेला ऑडीओ-व्हिज्युअल माध्यमाचा जादुगार म्हणाले ते ह्यासाठी.


उकल करून सांगते: दोन स्त्रिया. दोघींच्या जगण्यातली प्रचंड तफावत. आणि दोघींच्या डिझायर्समधली तफावतही. दिग्दर्शक म्हणून मंजुळे एकीच्या डिझायरला कमी नि दुसरीच्याला तुच्छ असा जजमेंटल स्टॅंड घेत नाही तर दोन समांतर जग दाखवतो जी भारत नावाच्या एकाच देशात घडत असतात एकाचवेळी. कारण मोनिकाचं डिझायर पूर्ण होणाऱ्या क्षणासाठीचंच पार्श्वसंगीत भावनासाठीच्या डिझायरलाही सुरू राहतं. कॅमेरा सरकतो. दृश्य अचानक कट होत नाही. पुन्हा बघा हवं तर.


ब्लॅक पॅंथर चळवळीने अपडेट झालेला स्त्रीवाद बायकांचे प्रकार पाडतो ते त्यांच्यात तफावत तयार करायला नव्हे तर आधीच अस्तित्वात असलेल्या तफावती समजून घ्यायला, सांगायला. तिथे पोथीनिष्ठ मार्क्सवादी आरोप करतात तसं ऑप्रेशन ऑलिंपिक्स खेळण्यासाठी नव्हे तर ऑपरेशनचं ऑलिम्पिक्स ऑलरेडी भरवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना(पांढरे+सवर्ण) उघडं करण्यासाठी. पोलिस पाटलाच्या हलकट प्रश्नाला भावनाला व भावनाच्या बापाला सामोरं जावं लागणार नसतं. तर उलट ती पोलिसाला excuse करून अंकुशला घेऊन जाऊ शकत असते.

तुर्तास इतकंच!

मुंजुळेंच्या त्यांनीच हुडकलेल्या सगळ्याच ॲक्टर्सना पुढील वाटचालीसाठी आपल्यातरी भरभरून शुभेच्छा!

#Jhund #jhundmovie

- कविता सुनंदा


Updated : 18 March 2022 10:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top