Home > Max Woman Blog > जज साहेब तुम्ही तरी समजून घेणं अपेक्षीत होतं...

जज साहेब तुम्ही तरी समजून घेणं अपेक्षीत होतं...

जज साहेब तुम्ही तरी समजून घेणं अपेक्षीत होतं...
X

प्रसंग नेहमीचाच... ज्यात आपला देश बऱ्यापैकी पुढ आहे. दर 24 मिनीटाला एक प्रकरणं आपल्या देशात जे घडतं अर्थात बलात्काराचं प्रकरण आहे. पण इथं थोडं वेगळं काहीसं घडलंय. ‘महिलाओंकी सम्मान में, ... मैदान में’ अशा देशात आपण रहातो म्हणून हे सांगणं गरजेच आहे.

ही घटना आहे. बिहारच्या अररिया या जिल्ह्यात घडलेली. ही घटना वेगळी का आहे? काय घडलंय नेमकं? सांगतायत मुक्ता मनोहर.

बिहारच्या अररिया या जिल्ह्यात घडलेली ही घटना. खुप खेडी आणि अतिशय दारिद्र्य असलेला हा जिल्हा. यात 792 खेडी आहेत. त्यातील 92 टक्के खेड्यांमध्ये कोणतीही वैद्यकीय सुवीधा नाहीय. 20 टक्के खेड्यांमध्ये औपचारिक शिक्षणाची सोय नाहीय तर 592 खेड्यांपर्यंत विजही गेलेली नाही. अशा जिल्ह्यात एक ‘जनजाग्रण शक्ती संघटन’ नावाची संस्था कार्यरत आहे. ही संस्था मजुरांना संघटीत करते.

या संघटनेच्या संपर्कात काम करणाऱ्या एका मुलीला मोटारसायकल शिकायची होती. 6 जूलैला एका ओळखच्या माणसाने शिकवतो सांगुन एका शाळेच्या मागे मैदानात बोलवलं. थोडा अंधार पडल्या नंतर तिने त्याला घरि सोडण्याची विनंती केली. घरि जाताना वाटेमध्ये चार गुंडांनी यांना अडवलं तिला पळवली, तिच्यावर सामुदाइक अत्याचार झाला. अशावेळी तिचा मित्र मात्र घाबरुन पळाला होता.

असह्य वेदना, शरिरातून होणारा रक्त स्त्राव अशा स्थितीत घरि जाऊ शकत नसल्याने, तिने संघटनेच्या कल्याणी बडोला आणि तन्मय निवेदीता यांना संपर्क केला. त्या मदतिसाठी धाऊन आल्या. त्यांनी मदत केली.

त्या नंतर 7 तारखेला सदर घटनेची पोलीसांत तक्रार नोंदवण्यात आली. मग मेडीकल आणि प्रत्येक ठिकाणी घडला प्रकार सांगणं हे आलंच. 10 तारखेला न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगण्यात आलं. न्यायालयात गेल्यागेल्या तिथल्या स्टाफरुनने तिला आत बोलवली. तिथं त्या मोटारचालका सोबत त्याचे नातेवाइकही आले होते. तिला कोर्ट रुममध्ये बोलऊन पुन्हा एकदा घडला प्रकार सांगायला सांगीतला आणि नंतर थोडा वेळ बाहेर थांबायला सांगीतलं.

कोर्ट रुम बाहेर आरोपी व त्याचे आई वडिल पिडीतेवर केस मागे घेण्यासाठी दबाव आणत होते. त्यानंतर जज साहेबांनी बोलवलं. इथं परत तिला आपल्यावर झालेल्या अत्याचाराचं कथन करावं लागलं. त्यानंतर जज साहेबांनी तिला एका कागदावर सही करायला सांगीतलं. पिडीतेने थोडं घाबरुन ‘त्या बाहेर थांबलेल्या तायांना आत बोलवा त्यांच्या समोर हे वाचा मग मी सही करेन’ असं सांगीतलं. याचा जज साहेबांना भयंकर राग आला. आरडा ओरडा झाल्याने कल्याणी, निवेदीता धावतच आत गेल्या. त्यांनीही जज साहेबांना हिच विनंती केली. जज साहेबांना हा स्वत:चा प्रचंड अपमान वाटला आणि त्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत या तिघींची रवानगी 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली.

वास्तवीकत: अशा वेळी पिडीत महिला भावनात्मक रित्या ब्रेक होऊ शकते. हे जज साहेबांनी समजून घेणं अपेक्षीत होतं पण तसं घडलं नाही. उटल सोबतच्या सर्वांना न्यायालयीन कोठडीत पाठवणं ही धक्कादायक बाब आहे.

दरम्यान, निर्भया प्रकरणानंतर एक वर्मा कमीटी स्थापन करण्यात आली. या कमीटीने सांगीतलं आहे की, ‘पिडीत व्यक्ती सोबत जर कुणी सामाजीक कार्यकर्त्या असतील तर त्यांनासुद्धा आत घेण्यात यावं’. इथं मात्र तसं केलं गेलं नाही. उलट सोबत आलेल्या दोघींना बाहेरच थांबवण्यात आलं.

Updated : 29 July 2020 12:40 AM GMT
Next Story
Share it
Top